News Flash

सारानं विकीसोबत काम करायला दिला नकार?

मुख्य अभिनेत्री म्हणून साराच्या नावाचा विचार करण्यात आला होता.

सारानं विकीसोबत काम करायला दिला नकार?

‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री सारा अली खाननं अल्पावधितच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. या चित्रपटानंतर ती ‘सिम्बा’मध्येही झळकली. दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर साराच्या पदरात अनेक चित्रपट आले. त्यात शहीद उधम सिंग यांच्या बायोपिकचाही समावेश होता.

विकी कौशल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री म्हणून साराच्या नावाचा विचार करण्यात आला. मात्र सारानं हा चित्रपट नाकारल्याचं समजत आहे. या बायोपिकमध्ये अभिनेत्री म्हणून फार वाव नसल्याचं म्हणत तिनं हा चित्रपट नाकारला असल्याचं समजत आहे.

तर दुसरीकडे ‘लव्ह आज कल २’ मुळे तिनं हा चित्रपट नाकारला असल्याचंही म्हटलं जात आहे. सारा अली खान अभिनेता कार्तिक आर्यनसोबत ‘लव्ह आज कल २’ मध्ये काम करत आहे. इम्तियाज अली या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. साराला एकाच चित्रपटावर लक्ष केंद्रीत करायचं आहे त्यामुळे तिनं शहीद उधम सिंग यांचा बायोपिक नाकारला असल्याची चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2019 11:48 am

Web Title: sara ali khan said no to shaheed udham singh biopic
Next Stories
1 सुरेश वाडकर यांचा हा नवीन लूक पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
2 आलिया भट्ट करणार एस. एस. राजामौलींचा चित्रपट
3 ‘ब्रॅडचं दारूचं व्यसन आणि जळफळाट यामुळे आमचा घटस्फोट’
Just Now!
X