News Flash

“आज काही काम नाही”; साराने शेअर केला पुस्तक वाचतानाचा फोटो

पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. कधी ग्‍लॅमरस तर कधी मजामस्ती करतानाचे फोटो ती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करते. साराच्या फोटोनां चाहत्यांची कायमच पसंती मिळताना दिसते. नुकताच साराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये साराच एक नवं रूप पाहायला मिळत आहे.

साराने घरामध्ये निवांत वेळ घालवत असतानाचा एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे या फोटोमध्ये ती सोफ्यावर निवांत पडल्याचं दिसतय. यात साराने क्यूट नाईट ड्रेस घातला आहे. तर एक पुस्तक वाचण्यात सारा चांगलीच रंगल्याचं दिसतंय. पुस्तक वाचताना चॉकलेट खाण्याची मजाही ती लुटतेय. फोटो शेअर करत साराने सांगितला आहे की तिच्याकडे कोणतही काम नसल्याने ती पुस्तक वाचत आहे .कॅप्शन मध्ये साराने म्हंटलं आहे. “आज काही काम नव्हतं म्हणून पुस्तक वाचतेय”. साराचा हा फोटो अनेक चाहत्यांनी लाईक केला आहे. या फोटोतील साराचा क्युट अंदाज सगळ्यांनाच आवडला आहे. काही तासातच या फोटोला पाच लाखांहून अधिक लाइकस् मिळाले आहेत.

सारा अली खान तिच्या फॅशनमुळे कायम चर्चेत असते. वेगवेगळ्या लूकमधली तिचे फोटो सोशल मीडिआवर व्हायरल होत असतात. सारा अली खान ‘अतरंगी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात सारासोबत अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भूमिकेत झळकतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 3:50 pm

Web Title: sara ali khan share photo reading in cute night dress kpw 89
Next Stories
1 प्रत्येक आईला वाढदिवसाला असं गिफ्ट मिळालं पाहिजे, कुशल बद्रिकेने सांगितला किस्सा
2 अँकर हिंदीत बोल्यावर, ए. आर. रेहमान यांनी उडवली खिल्ली
3 तारक मेहता आणि जेठालाल मध्ये भांडण, सेटवर एकमेकांशी बोलणं बंद
Just Now!
X