News Flash

‘सरफरोश’चा सिक्वेल येणार

चित्रपटाचा ‘सिक्वेल’ यावा अशी इच्छा आमिरनेही चित्रपटाचा दिग्दर्शक जॉन मॅथ्यू याच्याकडे बोलून दाखविली होती.

पाकिस्तानी दहशतवाद, भारतात पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या घातपाती कारवाया यावर आधारित असलेला ‘सरफरोश’ चित्रपट लोकप्रिय ठरला होता. लवकरच या चित्रपटाचा ‘सिक्वेल’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आमिर खानने या चित्रपटात मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागातील ‘अजय सिंह राठोड’ या पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका केली होती.

हा चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा ‘सिक्वेल’ यावा अशी इच्छा आमिरनेही चित्रपटाचा दिग्दर्शक जॉन मॅथ्यू याच्याकडे बोलून दाखविली होती. दिग्दर्शक जॉन याने सिक्वेल करायला होकार दिला आहे. ‘सरफरोश’चा हा सिक्वेल असला तरी मूूळ चित्रपटापेक्षा याचे कथानक थोडे वेगळे असणार आहे. अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी मूळ ‘सरफरोश’मध्ये खलनायक साकारला होता.

आमिर खान सध्या ‘दंगल’ या चित्रपटात व्यग्र आहे. यातून तो मोकळा झाल्यानंतर ‘सरफरोश’च्या सिक्वेलची जुळवाजुळव सुरू होईल, असे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2016 9:37 am

Web Title: sarfarosh movie sequel
Next Stories
1 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत बॉलीवूडचे वर्चस्व
2 अरबाज आणि मलायकाचा अखेर काडीमोड
3 प्रीती झिंटा पेड मीडियाच्या विरोधात!
Just Now!
X