मराठी सिनेमांच्या विषयांबाबत अलिकडे मराठी सिनेमा चांगलाच चर्चेत राहतोय. शिवाय मराठी सिनेमांचे टायटल सुद्धा नेहमी वेगळे, गमतीदार, अर्थपूर्ण असेच राहिलेले आहेत. असाच एक वेगळा विषय असलेला आणि अतिशय वेगळे टायटल असलेला ‘सासूचं स्वयंवर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘सासूचं स्वयंवर’ या सिनेमाचा फर्स्ट लूक लॉन्च नुकतचं करण्यात आले. फादर्स डे, मदर्स डे असे डेज असतात, पण या सिनेमाच्या निमित्ताने सिनेसृष्टीतील प्रसिद्ध सासूंना बोलावून, त्यांच्या हस्ते केक कापून ‘सासू डे’ साजरा करण्यात आला आणि या ‘सासू डे’ च्या आगळ्या वेगळ्या संकल्पनेसोबतच या सिनेमाचा फर्स्ट लूक लॉन्च १२ मार्च रोजी मुंबईत करण्यात आला. सिनेमा-मालिकांमध्ये सासूच्या भूमिका अजरामर केलेल्या अभिनेत्रींच्या उपस्थितीत हा धमाल सोहळा पार पडला. या सोहळ्याला सुप्रिया पिळगांवकर, रिमा लागू, हर्षदा खानविलकर, सविता मालपेकर, लीना मोगरे, कांचन अधिकारी, उषा नाडकर्णी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर देखील उपस्थित होते.
सेव्हन सिज मोशन पिक्चर्स प्रा.लि. प्रस्तुत ‘सासूचं स्वयंवर’ या धमाल विनोदी सिनेमाची निर्मिती संतोष परब आणि समीर परब यांनी केली असून सिनेमाच्या दिग्दर्शनाची आणि लेखनाची जबाबदारी ओमकार माने यांनी सांभाळली आहे. पुष्कर जोग, तेजा देवकर, विशाखा सुभेदार, विजय चव्हाण, जयंत वाडकर, सतीश तारे, यांच्या महत्वाच्या भूमिका असून हिंदीतील विनोदी अभिनेता सुनील पाल यांचीही या सिनेमात महत्वाची भूमिका असणार आहे. तर अभिनेत्री भार्गवी चिरमुले हीची पाहुणी कलाकार म्हणून एक छोटी भूमिका आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 17, 2015 9:22 am