25 February 2021

News Flash

ईदच्या दिवशी धडकणार ‘सत्यमेव जयते 2’चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो…

जॉनने शेअर केली खास पोस्ट, म्हणाला...

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा बहुचर्चित ठरत असलेल्या ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधत जॉनने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितलं आहे. सोबतच या पोस्टमध्ये तो भारताचा झेंडा फडकवताना दिसत आहे.

जॉनचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरत असलेला ‘सत्यमेव जयते 2’ हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे दरवर्षी ईदला अभिनेता सलमान खानचा चित्रपट प्रदर्शित होत असतो. मात्र, यावेळी जॉनच्या चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

जॉनने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो पारंपरिक भारतीय वेशात दिसत असून अभिमानाने तो देशाचा झेंडा फडकवत आहे. “तन मन धन से बढकर जन गण मन..सत्यमेव जयतेच्या संपूर्ण परिवाराकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ईदच्या दिवशी २०२१ मध्ये आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत”, असं कॅप्शन जॉनने या फोटोला दिलं आहे.

पाहा : पडद्यावर सईच्या तर रिअल लाइफमध्ये आदित्य आहे शिवानीच्या प्रेमात?

 दरम्यान, ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलाप झवेरी करत असून जॉनसोबतच अभिनेता मनोज बाजपेयीदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. तसंच दिव्या खोसला कुमार, मनोज बाजपेयी, अनूप सोनी, हर्ष छाया हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ‘सत्यमेव जयते 2’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सत्यमेव जयतेचा पुढचा भाग असून तो नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 12:56 pm

Web Title: satyamev jayate 2 release date out john abraham film will release on eid ssj 93
Next Stories
1 कोणी घर देता का घर..? राजकुमार राव नवीन घराच्या शोधात; नेटकरी म्हणतात…
2 कियारा-सिद्धार्थमध्ये नेमकं चाललंय तरी काय? लंच डेटचा व्हिडीओ व्हायरल
3 वरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली ‘ही’ गोष्ट
Just Now!
X