06 March 2021

News Flash

चाहत्याकडून अभिनेत्यांना अनोखी भेट!

संदेश नागांवकर असे या चाहत्याचे नाव आहे.

‘डॉक्टर डॉन’, ‘लाव रे तो व्हिडिओ’, ‘प्रेम पॉयजन पंगा’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ हे झी युवावरचे सध्याचे लोकप्रिय कार्यक्रम. प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती म्हणजे या मालिकांच्या वाढलेल्या प्रेक्षक संख्येतून दिसून येतेच आहे पण त्याबरोबरच चाहते आता विविध मार्गाने आपले हे प्रेम किंवा क्रेझ कलाकारांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतायेत. विश्वास बसत नाहीये ना..? मुंबईतल्या संदेश नागांवकर यांचं उदाहरणच बघा ना. त्यांनी मास्कवर आवडत्या कलाकारांचे फोटो छापले आहेत.

झी युवावरच्या या मालिकांचे आणि यातल्या कलाकारांचे संदेश मोठे फॅन आहेत. त्यांनी आता त्यांच्या या आवडत्या कलाकारांची आणि व्यक्तिरेखांची छायाचित्रं असलेले मास्क चक्क बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेत. ज्यात या लोकप्रिय व्यक्तिरेखांची छायाचित्रे तुम्हाला पहायला मिळतातच सोबत त्यांचे आवडते डायलॉग्ज, पंचलाईन्स किंवा वनलाईनर्स पण वाचायला मिळतात. मग ते डॉक्टर डॉन मालिकेतला डॅशिंग डॉन देवा असो किंवा डॉक्टर मोनिका असो. प्रेम पॉयजन पंगा मधले आपल्या सर्वांचे लाडके जुई आलाप असो किंवा ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेमधली सई आणि नचिकेतची गोड जोडी असो किंवा घरातले आदरणीय अप्पा केतकर असोत.

मुंबईमध्ये सध्या संदेश नागांवकर यांच्या दुकानामध्ये हे आकर्षक मास्क विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेत. सध्या करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये मास्कचे महत्व आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये किती अनन्य साधारण आहे हे वेगळे सांगायला नको. यात आता संदेशजींसारखे सामाजिक जाणिवा जपणारे प्रेक्षक जेव्हा अशा पद्धतीचे उपक्रम राबवतात तेव्हा मनोरंजन आणि सामाजिक जबाबदारी यांची सुंदर सांगड जूळून येते. एकूण काय तर या मास्कमुळे चाहत्यांनासामाजिक जबाबदारीही निभवता येईल आणि आपल्या लाडक्या कलाकारांनासोबत घेऊन मिरवताही येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 5:58 pm

Web Title: serial favorite character print on mask by fan avb 95
Next Stories
1 टायगरने ‘मून वॉक’ करत मायकल जॅक्सनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; पाहा व्हिडीओ…
2 रिचा चड्ढाने सांगितले भांगचे फायदे, नेटकऱ्यांनी सुनावले
3 मक्याचं कणीस ट्विट करत बिग बींनी सांगितलं यशाचं गमक; फोटो होतोय व्हायरल…
Just Now!
X