News Flash

शबाना आजमी यांना मागावी लागली भारतीय रेल्वेची जाहीर माफी

शबाना आजमी यांनी ट्विटरला एक व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यामध्ये कर्मचारी घाणेरड्या पाण्यात प्लेट्स धुत होते

शबाना आझमी

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी यांना भारतीय रेल्वेची माफी मागावी लागली आहे. झालं असं की, शबाना आजमी यांनी ट्विटरला एक व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यामध्ये कर्मचारी घाणेरड्या पाण्यात प्लेट्स धुत होते. हे कर्मचारी भारतीय रेल्वेचे आहेत असं समजत शबाना आजमी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनाही टॅग केलं होतं. शबाना आजमी यांनी पोस्ट केलेल्या ३० सेकंदाच्या व्हिडीओत काही कर्मचारी खड्ड्यात साचलेल्या घाणेरड्या पाण्यात प्लेट्स धुताना दिसत होते. सोमवारी सकाळी शबाना आजमी यांनी व्हिडीओ पोस्ट करत पियूष गोयल यांना पाहण्याचं आवाहन केलं होतं. संध्याकाळी रेल्वे मंत्रालयाने स्पष्टीकरण देत त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली.

मॅडम हा व्हिडीओ मलेशिअन रेस्टॉरंटमधील असल्याचं रेल्वे मंत्रालायने ट्विटरला रिप्लाय देत सांगितलं. यावेळी त्यांनी एक बातमीची लिंकही सोबत दिली. यानंतर लगेचच आपली चूक लक्षात येताच शबाना आजमी यांनी माफी मागितली. पण तोपर्यंत ट्विटरकरांना आयती संधी मिळाली होती. त्यांनी शबाना आजमी यांना ट्रोल करत रेल्वेला त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यास सांगितलं. यानंतर शबाना आजमी यांनी आपण पुन्हा एकदा आपण बिनशर्त माफी मागितलं असल्याचं सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 4:07 am

Web Title: shabana azmi aplogise indian railway
Next Stories
1 मोकळ्या वेळेत मुलांची शिकवणी घेणारा जम्मूतील आयपीएस अधिकारी ठरतोय हिरो
2 डॉक्टरची माणुसकी, नातेवाईकांनी नकार दिल्यानंतर स्वत: केले मृतदेहांवर अंत्यसंस्कार
3 रामदेव बाबांना दिलासा, ६ हजार कोटींचा पतंजली फूड पार्क उत्तर प्रदेशातच होणार
Just Now!
X