बॉलीवूड बादशाहा शाहरुख खानने नवीन वर्षाचा पहिला दिवस त्याचा लहान मुलगा अबराम याच्यासोबत घालावला. आयपीएलमधील कोलकाता नाइट राइडरचा सह-मालक असलेल्या शाहरुखने इंडियन प्रिमियर लिगचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यासोबत काही वेळ घालवला. यावेळी राजीव यांनी शाहरुख आणि अबरामसोबतचे त्यांचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले. या छायाचित्रात शाहरुख आणि अबरामची एकसारखी हेअरस्टाइल दिसत आहे.