05 December 2020

News Flash

दोन वर्षांच्या ब्रेकनंतर किंग खानची धमाकेदार एण्ट्री; एकाच वेळी साइन केले तीन चित्रपट

झिरोनंतर शाहरुख झळकणार 'या' तीन चित्रपटांमध्ये

२०१८ साली प्रदर्शित झालेला ‘झिरो’ हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानने मुख्य भूमिका साकारली होती. मात्र,हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नाही. या चित्रपटानंतर किंग खान कोणत्याही चित्रपटामध्ये झळकल्याचं पाहायला मिळालं नाही. मात्र लवकरच तो ‘पठाण’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासोबतच त्याने अन्य दोन नवीन प्रोजेक्टदेखील साइन केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या शाहरुख तीन चित्रपटांवर काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

दोन वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर शाहरुख त्याच्या आगामी चित्रपटांसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे तो लवकरच पठाणव्यतिरिक्त राजकुमार हिरानी आणि दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली कुमार यांच्या चित्रपटांमध्येही झळकणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एटली दिग्दर्शित करत असलेल्या  चित्रपटाने नाव ’सनकी’ असं असून शाहरुख यात डबल रोल साकारणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

‘डुप्लिकेट’ आणि ‘डॉन’ या चित्रपटानंतर शाहरुख तिसऱ्यांदा दुहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अद्याप या चित्रपटाचं नाव स्पष्ट झालं नसलं तरीदेखील यात तो वडील आणि मुलगा अशा दोन भूमिका साकारणार आहे.

दरम्यान, पुढील वर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल असं म्हटलं जात आहे. सध्या शाहरुख पठाण या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण स्क्रीन शेअर करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 5:51 pm

Web Title: shah rukh khan double role atlee film south filmmaker dcp 98 ssj 93
Next Stories
1 मोनालिसा बागल निघाली ‘भिरकिट’च्या सवारीला
2 तरुणाईला थिरकायला लावणारं पार्थ-प्रथमेशचं भन्नाट गाणं
3 Photos : नेहा कक्करची लगीनघाई; मेहंदी व हळदीचे फोटो व्हायरल
Just Now!
X