बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्री कायमच त्यांच्याकडील महागड्या वस्तूंमुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमधील बादशाह म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. आपल्या अभिनयाने अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर भुरळ घालणाऱ्या शाहरुखने नुकतीच एक गोष्ट सांगितली आहे. आपले वार्षिक उत्त्पन्न २५६ कोटी रुपये असल्याचे त्याने सांगितले, त्यामुळे तो श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या तो आपल्या झिरो या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त असून या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्याकडे असलेली सर्वात महागडी गोष्ट कोणती असाही प्रश्न त्याला नुकताच विचारण्यात आला.
यावर शाहरुखने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले. वांद्रे येथे असणारे आपले घर ही सर्वात आपल्याकडील सर्वात महागडी गोष्ट असल्याचे तो म्हणाला. अहवालानुसार समुद्रकिनाऱ्यावर अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेल्या त्याच्या मन्नत या बंगल्याची किंमत अंदाजे २०० करोड आहे. आता आपल्या कुटुंबासोबत शाहरुख याच बंगल्यात राहतो. त्याचे चाहते देशभरातून त्याचा हा मन्नत बंगला आणि त्याची एक छबी दिसावी यासाठी याठिकाणी गर्दीही करतात. त्यामुळे बादशाहकडची महागडी वस्तू कोणती याचा खुलासा त्याच्या चाहत्यांना झाला आहे. या घराबरोबरच त्याच्याकडे महागड्या अशा अनेक वस्तू असण्याची शक्यता आहे. पण २०० करोड ही रक्कम खूपच मोठी असल्याने तीच त्याची सर्वात महागडी दौलत असल्याचे सध्या दिसत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 31, 2018 12:09 pm