अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार टीका होत आहे. अनेक कलाकार व चित्रपट समिक्षक स्वत:हून पुढे येत बॉलिवूडमधील गटबाजीवर भाष्य करत आहेत. याच दरम्यान प्रसिद्ध पत्रकार शेखर गुप्ता यांनी निर्माता करण जोहरची पोलखोल केली आहे. करणच्या चित्रपटाला पुरस्कार दिला नाही तर थेट पुरस्कार सोहळ्यावरच बहिष्कार टाकू अशी धमकी त्याने दिली होती. आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या या मागणीला शाहरुख खानने देखील पाठिंबा दिला होता, असा खळबळजनक आरोप शेखर गुप्ता यांनी केला आहे.

अवश्य पाहा – टायगरच्या बहिणीनं मादक अदांनी अनेकांना केलं घायाळ; सेलिब्रिटीही झाले फिदा

शेखर गुप्ता यांनी द प्रिंट या वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात बॉलिवूड सिनेउद्योगाची पोलखोल केली आहे. या लेखात त्यांनी करण जोहरचा १० वर्षांपूर्वीचा एक किस्सा देखील सांगितला आहे. ते म्हणाले, “२०१० साली माय नेम इज खान हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षक व समिक्षकांचा फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. तरीही या चित्रपटाला पुरस्कार द्यावा अशी मागणी करण जोहरने केली होती. कारण या फ्लॉप चित्रपटावर त्याने प्रचंड पैसा खर्च केला होता. परंतु जुरींनी त्याच्या मागणीस नकार दिला. त्यावेळी त्या पुरस्कार सोहळ्यावरच बहिष्कार टाकण्याची धमकी त्याने दिली होती. त्याच्या या धमकीला शाहरुख खान आणि काही अन्य कलाकारांनीही पाठिंबा दिला होता. करणने धमक्या देऊन असे अनेक पुरस्कार बळकावले आहेत.” असा किस्सा शेखर गुप्ता यांनी सांगितला.

अवश्य पाहा – सुशांत आत्महत्या प्रकरण: करणवर आरोप करताना कंगनाने आदित्य ठाकरेंचाही केला उल्लेख

शेखर गुप्ता यांनी अनेक माध्यम संस्थांसाठी संपादक पदावर काम केलं आहे. ते एक नामांकित चित्रपट समिक्षक म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांनी अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये जुरींची भूमिका देखील बजावली आहे. या पार्श्वभूमीवर शेखर गुप्तांनी केलेल्या या आरोपांमुळे बॉलिवूमध्ये सध्या खळबळ माजली आहे.