News Flash

“… मग १२ वकिलांशी चर्चा करण्याची गरज का पडली”, अभिनेत्रीचा दीपिका पदूकोणवर निशाणा

तिचे हे ट्विट चर्चेत आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजूपत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना ड्रग्ज सेवन प्रकरण समोर आले. त्याची अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे चौकशी सुरु आहे. या चौकशी दरम्यान अभिनेत्री दीपिका पदूकोणचे नाव समोर येताच चौकशीसाठी एनसीबीने समन्स पाठवले. त्यानंतर दीपिकावर अनेकांनी निशाणा साधला. अभिनेत्री शर्लिन चोप्राने देखील ट्विट करत दीपिकावर सुनावले आहे.

‘जर तू मालाचे सेवन करत नाहीस, मग १२ वकीलांसोबत चर्चा करण्याची गरज का पडली? खरे बोलणाऱ्यांना पॅनिक किंवा एंग्झायटी अटॅक येत नाहीत. जेथे निडरता असते तिथे भय किंवा भीती यासारख्या गोष्टींना स्थान नसते’ या आशयाचे ट्विट तिने केले आहे.

सुशांत मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीदरम्यान दीपिका पदूकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर यांची नावे समोर आली होती. अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार, आज शनिवारी (२६ सप्टेंबर) रोजी दीपिका, सारा आणि श्रद्धा या तिघींची एनसीबी चौकशी सुरु आहे. तसेच काल शुक्रवारी (२५ सप्टेंबर) रकुल प्रीत सिंह आणि दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची चौकशी करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 1:57 pm

Web Title: sherlyn chopra takes dig on deepika padukone avb 95
Next Stories
1 “त्यावेळी तुमच्या पत्नीवरही अशा कमेंट येत होत्या का?’; गावसकरांना झरीनचा सवाल
2 “स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्ज…,” रवीना टंडनने व्यक्त केला संताप
3 “हा मूर्खपणा…,” ड्रग्ज प्रकरणी सेलिब्रेटींच्या चौकशीवरुन जावेद अख्तर संतापले
Just Now!
X