News Flash

‘ब्रोकन ब़ट ब्युटिफूल ३’: सिद्धार्थ शुक्ला आणि सोनिया राठीच्या किसिंगचा व्हिडिओ व्हायरल

सिद्धार्थ शुक्ला पुन्हा चर्चेत; 'बिग बॉस १३'चा ठरला होता विजेता

‘बिग बॉस १३’ या रिऍलिटी शोचा विजेता ठरल्यामुळे अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला होता. आता तो पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांचं मन जिंकण्यासाठी तो सज्ज होत आहे. एका वेबसीरीजमधला त्याचा किसिंग सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे आता या वेबसीरीजबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सिद्धार्थ शुक्ला लवकरच एकता कपूरच्या गाजलेल्या ‘ब्रोकन ब़ट ब्युटिफूल’ या वेबसीरीजच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री सोनिया राठी काम करत आहे. या दोघांमधला रोमान्स या वेबसीरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. एकता कपूरने या वेबसीरीजशी संबंधित एक व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर स्टोरीच्या माध्यमातून शेअर केली आहे. अनेक चाहत्यांनी तसंच मनोरंजनाच्या पेजेसनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by CelebrityTadka (@celebritytadkaa)

यात सिद्धार्थ आणि सोनिया लिपलॉक किस करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना एकता म्हणते, “माझा आवडता शो परत येत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना तुफान आवडला आहे.”

चाहत्यांनीही या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला आहे. एका युजरने ही वेबसीरीज आणल्याबद्दल एकताचे आभार मानले आहेत तर काही युजर्सना सिद्धार्थ आणि सोनिया यांच्यातली केमिस्ट्री आवडली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एकताने या शोची घोषणा केली होती. या सीरीजचा एक प्रोमोही तिने शेअर केला होता. त्यासोबत तिने लिहिलं होतं, “प्रत्येक शेवट नव्या सुरुवातीकडे घेऊन जात असतो आणि हे आपल्या प्रत्येकाच्याच मनातलं आहे. प्रवास सुरु होत आहे आणि आम्ही रुमी आणि अगस्त्यची ओळख करून देत आहोत.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 2:13 pm

Web Title: siddharth shukla and sonia rathee kissing scene viral vsk 98
Next Stories
1 “राजकारण्यांच्या प्रचारसभा चालतात पण सामान्य व्यक्ती ऑफिसला नाही जाऊ शकत”
2 फोटोग्राफर्सनी सांगितलं आणि गरोदर असतानाही गीता बसराने केलं…नेटिझन्स भडकले!
3 कंगनाने केली महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी; म्हणाली, “शिवसेनेने धमकी…..”
Just Now!
X