News Flash

किर्ती कुल्हारी व ‘तुंबाड’ फेम सोहम शाह करणार एकत्र काम

हे दोघेही त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात

सोहम शाह, किर्ती कुल्हारी

‘शिप ऑफ थिशियस’ व ‘तुंबाड’ सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता सोहम शाह लवकरच एका नवीन चित्रपटात दिसणार आहे. ‘उरी’, ‘पिंक’ अशा चित्रपटांमधून आपले अभिनयकौशल्य दाखवणारी अभिनेत्री किर्ती कुल्हारी व सोहम पहिल्यांदाच एका शॉर्ट फिल्ममध्ये एकत्र काम करणार आहेत. हे दोघेही त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. पवन कृपलानीच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे.

आताच त्या दोघांनी या लघु चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. पण या शॉर्ट फिल्मची नेमकी कथा काय आहे हे अजूनपर्यंत निर्मात्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. पण, सोहम व किर्तीसारखे कलाकार या शॉर्ट फिल्ममध्ये एकत्र असल्याने हा लघु चित्रपट नक्कीच असामान्य असेल यात शंका नाही. सोहम व किर्तीचे चाहते या शॉर्ट फिल्मची आतुरतेने वाट बघत आहेत.

शिप आॅफ थिशियस, तुंबाड, तलवार, सिमरन, गुलाब गॅंग अशा चित्रपटांमधून सोहमने कायमच आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. किर्तीने पिंक चित्रपटातून तिचे अभिनयाचे कसब दाखवले होते. उरी चित्रपटाही तिने छोटीशी पण महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. नुकत्याच आलेल्या ‘फोर मोअर शॉट्स’ या वेब सीरिजमध्येही तिने बोल्ड भूमिका केली होती. त्यांच्या अभिनयाचा आलेख चढताच आहे. फक्त रुपेरी पडद्यापुरतं स्वतःला मर्यादित न ठेवता अभिनयाच्या इतर माध्यमांमध्ये सुद्धा ते आपलं कौशल्य दाखवत आहेत.

त्यांनी नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून हा फोटो बघून त्यांनी शूटिंगदरम्यान केलेली धमाल लक्षात येते. लवकरच ते आपल्या चाहत्यांना या शॉर्ट फिल्मविषयी विस्ताराने सांगणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 4:46 pm

Web Title: soham shah kirti kulhari working together
Next Stories
1 भारत VS टीम इंडिया, प्रेक्षक कोणाला निवडणार?
2 कतरिना सांगतेय तणावमुक्त जगण्याचा मार्ग
3 Bigg Boss Marathi 2 : नेहा की शिव, कोण होणार पहिला कॅप्टन?
Just Now!
X