बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ९० च्या दशकात आपल्या आवाजातील रोमॅण्टिक गाण्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली आज तेच गायक त्यांच्या नव्या लुकने प्रेक्षकांना आश्चर्य केलंय. सुप्रसिद्ध गायक शान आणि सोनू निगम यांनी आपल्या जबरदस्त ट्रान्सफोर्मेशनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोमधील दोघांच्याही लुकला पाहून आश्चर्य झालेले फॅन्स त्यांच्या ट्रान्सफोर्मेशनचं कौतुक करताना दिसून येत आहेत.

गायक सोनू निगमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोघांचा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये शान आणि सोनू निगम हे दोघे एकत्र दिसून येत आहेत. या पोस्ट वर्कआऊट फोटोमध्ये शान आणि सोनू निगम हे दोघे कॅमेरासमोर स्माईल देताना दिसून येत आहेत. जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर या दोघांनी हा फोटो क्लिक केलाय. दोघे बॉलिवूड सिंगर्स आपला नवा लुक शो ऑफ करताना दिसून आले आहेत.

शानने त्याचा फोटो शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहिली आहे. यात त्याने लिहिलंय, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चॅम्प !!! सोनू निगमचे आणखी एक धमाकेदार वर्ष होऊ देत .. प्रेम, चीअर्स, शांती आणि संगीताने भरलेले !!!! भाऊ तुम्हाला अधिक शक्ती मिळो.” असं लिहित त्याने हा फोटो शेअर केलाय. या कॅप्शनसोबत गायक शानने बरेच इमोजी देखील वापरले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shaan (@singer_shaan)

गायक आहेत की बॉडी बिल्डर?

शान आणि सोनू निगमच्या या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनवर चाहते भलतेच खुश आहेत. काही फॅन्स तर त्यांचा नवा लुक पाहूण आश्चर्यचकित झाले आहेत. मला सांगता येणार नाही की तुम्ही दोघेही गायक आहात की हिरोज की मग बॉडी बिल्‍डर्स?, अशा कमेंट्स फॅन्स त्यांच्या फोटोवर करत आहेत. यासोबतच, कित्येक फॅन्स दोघांच्या ही नव्या लुकचं कौतुक करत आहेत. एका चाहत्याने तर ‘दोघांनीही त्यांचं मोठं होण्याला आणखी खास बनवलंय.’ अशी कमेंट केली आहे.

अनेक बदलांचा सामना केलाय सोनू आणि शानने

सोनू निगम आणि शान हे दोघेही आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक बदलांचा सामना करत आले आहेत. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत शानने सांगितलं की, मी आतापर्यंत सुरूवातीला आठवड्यातून दोन वेळा रेकॉर्डिंग,त्यानंतर महिन्यातून दोन रेकॉर्डिंगपासून ते मग वर्षातून दोन वेळच्या रेकॉर्डिंगपर्यंत गेलो आणि तेव्हाच मी ठरवले की मी गोष्टी माझ्या हातात घेणार आहे आणि त्यानंतर मी ही सुरुवात केली.”

 

युट्युबवर रिलीज केलंय गाणं

या मुलाखतीत बोलताना शान म्हणाला, “म्युझिक लेबल आणि मी आमचं मूळ गाणं युट्यूबवर रिलीज केलंय. आजच्या नव्या कलाकारांना त्यांच्या चित्रपटासाठी नव्या गायकांनी त्यांची गाणी गायले पाहीजे, अशी त्यांची इच्छा असते.” गेल्या काही दिवसांपासून सोनू निगम टी-सीरीज या म्युझिक कंपनीसह बॉलिवूडवर सुद्धा आपला निशाणा साधताना दिसून येत आहे.