बॉलीवूडचा सुप्रसिद्ध गायक सोनू निगम याचा मागील आठवड्यात भिकाऱयाच्या वेषात रस्त्यावर गाणे गात फिरणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. रस्त्याच्या कडेला बसून गाणे गाणाऱया सोनू निगमच्या हातात एका वाटसरू तरुणाने १२ रुपये टेकवले होते. त्या तरुणाला भेटण्याची इच्छा सोनूने व्यक्त केली होती. सोनूची ही इच्छा पूर्ण देखील झाली. सोनूच्या टीमने त्या तरुणाला शोधून काढले आणि शहबाज अली सय्यद असे या तरुणाचे नाव आहे. शहबाजला आपल्या घरी बोलावून सोनूने सरप्राईज दिले.

पाहा: भिकाऱ्याच्या वेषातील सोनू निगम रस्त्यावर बसून गातो तेव्हा…

‘बीईंग इंडियन’ मंगळवारी पोस्ट केलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सोनू ‘क्रेझी दिल मेरा’ या आगामी गाण्यानिमित्त फेसबुकवरुन चाहत्यांशी लाईव्ह चॅट करत होता. हे चॅट सुरु असतानाच सोनूला १२ रुपये देणारा शहबाज अली सय्यद त्याच्या घरी प्रवेश करतो आणि शिरताच सोनूला आलिंगन देतो. सोनूशी भेट हे शहबाजसाठी सरप्राईझ होते. सोनू निगमशी भेट झाल्याने शहबाज खूप आनंदी झाला. दोघांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. शहबाजने दिलेले १२ रुपये हा सर्वात मोठी कमाई असल्याचे सोनूने सांगितले होते. ते १२ रुपये फ्रेम करून आपल्याला मिळालेल्या बक्षिसांच्या रांगेत ठेवणार असल्याचे सांगितले होते. ते सोनूने खरं करून दाखवले. शाहबाजने दिलेले १२ रुपये सोनूने फ्रेम करून ठेवले आहेत. सोनूने ती फ्रेम दाखवताच शाहबाजला भरून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.