बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने करोना काळात लाखो गरजूंची मदत केलीय. कधी लोकांना आपल्या गावी जाण्याची सोय करून देणं तर कधी मृत्यूच्या दारात असलेल्या व्यक्तीला ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करून देणं. वेगवेगळ्या माध्यामातून सोनू सूदने अनेकांची मदत केलीय. यासाठीच देशभरातून लाखो लोक सोनूचे चाहते झाले असून अनेक जण मदतीसाठी आता सोनूकडे आशेच्या नजरेने पाहत आहेत. मात्र अशात काही चाहते सोनू सूदकडे अशी मागणी करतात की यावर हसू आवरणं सोनूलादेखील कठीण होतं.
असंच काहीस पुन्हा एकदा घडलं आहे. एका तरुणाने सोनूकडे विचित्र मागणी केली. प्रेयसी iPhone मागत असल्याचं हा तरुण म्हणाला आहे. ‘इंजीनियरिंग लडका’ नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरून एका तरुणाने सोनूला प्रश्न विचाराला. “भावा माझी गर्लफ्रेण्ड iPhone मागतेय, काही होवू शकतं का?” असा प्रश्न या चाहत्याने केला. यावर सोनूनेदेखील मजेशीर उत्तर दिलंय. तो म्हणाला, “त्याचं तर काही माहित नाही पण iPhone दिला तर मग तुझं काहीच राहणार नाही.” यासोबतच सोनूने काही हसणारे इमोजी दिले आहेत.
हे देखील वाचा :‘या’ गोष्टीत अजय देवगण ठरला नंबर वन; सलमान खान आणि साउथ स्टार विजयलाही टाकलं मागे!
उसका तो पता नहीं,
अगर iphone दिया तो पर तेरा कुछ नहीं रहेगा https://t.co/t99rnT8z22
— sonu sood (@SonuSood) June 22, 2021
पहा फोटो: ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत लतिकाने साजरी केली वटपौर्णिमा
सोनू सूदचं हे ट्विट सध्या तुफान व्हायरल होतंय. सोनूच्या या प्रतिक्रियेनंतर अनेकजण अजूनही मदतीची याचना करताना पाहायला मिळत आहेत.
सोनूने मुलाला लक्झरी कार गीफ्ट केल्याच्या अफवा
दरम्यान काही दिवसांपूर्वीच सोनू सूदने त्याच्या मुलाला ३ कोटी रुपंयांची कार खरेदी करून दिल्याची बातमी समोर आली होती. मात्र त्यानंतर सोनू सूदने मुलासाठी कोणतीच कार घेतली नसल्याचं स्पष्ट केलं. सोनू सूदने स्वतः पुढे येत मुलासाठी ३ कोटीची महागडी कार घेतल्याच्या अफवांचं खंडन केलं. यावेळी त्याने सांगितलं की, “यात कोणतही सत्य नाही. मी माझ्या मुलासाठी कोणतीच कार घेतलेली नाही. व्हिडीओमध्ये दिसत असलेली कार आमच्या घरी ट्रायलसाठी आली होती. आम्ही टेस्ट ड्राईव्ह साठी गेलो होतो. पण आम्ही कोणतीच कार खरेदी केली नाही.” यापुढे बोलताना सोनू सूद म्हणाला, “यात फादर्स डे चा अॅंगल कुठून आला ते माहित नाही मला. फादर्स डे च्या दिवशी मी माझ्या मुलाला गिफ्ट का देणार ? याउलट त्यांनी मला काही तरी गिफ्ट केलं पाहिजे. शेवटी आज माझा दिवस आहे.” असं म्हणत सोनूने या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं.