गेल्या वर्ष भरापासून करोनाच संकट आपल्यावरून काही गेलेले नाही. आता तर करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतं आहे. तर, मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. देशात करोनाचा कहर अद्यापही सुरु असून दैनंदिन रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, अभिनेता सोनू सूदने करोनाच्या संकटातून बाहेर पडण्याचा इपाय सांगितला आहे.

सोनूने ट्विट करत त्याचे मत मांडले आहे. त्याचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. करोनाच्या काळात आपल्याला मिळालेल्या धड्याबद्दल त्याने सांगितले आहे. “जर देश वाचवायचा असेल तर रुग्णालय बांधावे लागतील”, असे ट्विट सोनूने केले आहे. तर नेटकऱ्यांनी सोनूच्या या ट्विटवर त्यांची प्रतिक्रिया ही दिली आहे.

या आधी सोनूने करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दहावी आणि बारावीच्या परिक्षा पुढे ठकलण्याची मागणी केली होती. तर या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर त्याने यावर त्याची प्रतिक्रिया दिली होती. “शेवटी हे झालचं, सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा”, अशा आशयाचे ट्विट करत सोनून सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

लॉकडाउनच्या काळात सोनू सूदने वेगवेगळ्या शहरात अडकलेल्या अनेक स्थलांतरित मजुरांना घरी पोहोचवलं. तसंच इतर गरजूंच्या मदतीलाही तो सातत्याने धावून जाताना दिसत आहे.