News Flash

सुशांतच्या एक्स मॅनेजरला ओळखत नाही; प्रेमप्रकरणाच्या आरोपांवर सूरज पांचोलीची प्रतिक्रिया

सूरज पांचोलीला संताप अनावर

बॉलिवूडचा दिवगंत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युच्या काही आठवड्यांपूर्वी त्याची माजी मॅनेजर दिशा सालियनने देखील इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती.तिच्या निधनानंतर कलाविश्वात मोठी खळबळ निर्माण झाली होती. केवळ इतकंच नाही तर अभिनेता आदित्य पांचोली यांच्या मुलावर सूरज पांचोलीवर काही आरोपही करण्यात आले होते. या प्रकरणी सूरजने त्यांच मौन सोडलं असून त्याच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे.

दिशाच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर सूरज पांचोलीवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. यात सुशांत सिंह राजपूत आणि सूरजमध्ये मोठा वाद झाला होता असं काहींच म्हणणं आहे. तर, दुसरीकडे सूरज आणि सलमान खानमध्येदेखील हाणामारी झाली होती, असं म्हटलं जातं आहे. इतकंच नाही तर दिशा आणि सूरज एकमेकांसोबत सिक्रेट रिलेशनशीपमध्ये होते, असं म्हटलं जात आहे. मात्र या साऱ्यावर सूरजने संताप व्यक्त केला आहे, असं ‘बॉम्बे टाइम्स’च्या वृत्तात म्हटलं आहे.

“सुशांत सिंह राजपूतसोबत माझं भांडण किंवा मारामारी का होईल? माझं आणि त्याचं कधीच कोणतं भांडण झालं नव्हतं. यापूर्वीदेखील मी याविषयी स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि तसंच सलमान खान माझ्या वैयक्तिक आयुष्यात का हस्तक्षेप करेल? त्याच्याकडे दुसरं काम नाहीये का? मला हेसुद्धा माहित नाही की दिशा कोण आहे. मी कधीही दिशाला भेटलो नाहीये. सुशांतच्या आत्महत्येनंतर मला दिशाच्या मृत्युविषयी समजलं आणि तिच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे”, असं सूरजने सांगितलं.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येपूर्वी दिशानेदेखील आत्महत्या केली. तिने इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवनाचा अंत केला. तिच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या होत्या.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 11:35 am

Web Title: sooraj pancholi blast claims related to sushant singh rajput and disha salian death ssj 93
Next Stories
1 सलमान-सोहेल-अरबाजमध्ये कोणाची निवड करणार? लूलियाने दिले भन्नाट उत्तर
2 ‘रामलीला’चा सेट अन् दीप-वीरची केमिस्ट्री; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
3 सलमानने बिग बॉस १४साठी वाढवली फी, घेणार इतके कोटी?
Just Now!
X