करोनाच्या संकटामुळे ठप्प असलेली टेलिव्हिजन इंडस्ट्री आता हळूहळू पूर्वपदावर येतेय. स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार, आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, मोलकरीण बाई, वैजू नंबर वन आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली. शूटिंग सुरू होण्यापूर्वी कलाकारांच्या मेकअप रूम आणि संपूर्ण सेट सॅनिटाइज करण्यात आला. सरकारी सूचनांचं पूर्णपणे पालन करत सेटवर शूटिंगचा श्रीगणेशा करण्यात आला.

कलाकारांसाठी सेट म्हणजे दुसरं घर असतं. तीन महिन्यांपेक्षा जास्त काळानंतर सेटवर पुन्हा हजेरी लावल्यानंतर कलाकारही आनंदात होते. आई कुठे काय करते मालिकेत आई म्हणजेच अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकर आपल्या सेटवरच्या कुटुंबाला भेटून भारावून गेल्या होत्या.

vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
Moscow concert hall attack suspects confess
मॉस्को हल्ल्याप्रकरणी चौघांचा कबुलीजबाब
Loksatta entertainment Two new serials Sadhi Manasam and Groghari Matiti Chuli released
नवे कलाकार, नवी मांडणी..

मोलकरीण बाई मालिकेत अंबिकाची भूमिका साकारणाऱ्या सुप्रिया पाठारे म्हणाल्या, “मी सेट, मेकअप रुम आणि माझ्या सहकलाकारांना खूप मिस केलं. आता शूटला सुरुवात झालीय त्यामुळे आनंद आहे. आम्ही स्वत:ची आणि एकमेकांची काळजी घेत शूटिंग करत आहोत. प्रेक्षकांना पुन्हा भेटण्यासाठी मी उत्सुक आहे.”

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपाची व्यक्तिरेखा साकारणारी रेश्मा शिंदे म्हणाली, “मी माझ्या सहकलाकारांना भेटण्यासाठी खूपच उत्सुक होती. अखेर तो क्षण आलाय. मालिकेचा पहिला एपिसोड जेव्हा प्रसारित झाला तेव्हा मनात जेवढी धाकधूक होती तिच धाकधूक आता शूटिंग सुरु झाल्यानंतर आहे. कार्तिक-दीपाच्या लग्नसोहळ्यावर मालिका येऊन थांबली होती. त्यामुळे यापुढील भाग खूपच उत्कंठावर्धक असतील.”