04 August 2020

News Flash

VIDEO: अखेर ‘सुलतान’मधील ‘ते’ वादग्रस्त गाणे प्रदर्शित

अरिजीतने अनेकदा माफी मागूनही सलमानचा राग गेला नाही.

सलमान खान आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सुलतान चित्रपटातील ‘जग घुमिया’ हे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात हे दोघे रोमान्स करताना दिसतात.
विशेष म्हणजे या गाण्यास गायक राहत फतेह अली खान यांनी गायले आहे. हो ते हेच गाणे ज्यावरून काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. आधी या गाण्याला गायक अरिजीत सिंग याने आपला आवाज दिला होता. पण सलमान आणि अरिजीतमध्ये काही वाद झाल्याने त्याने गायलेले गाणे चित्रपटातून काढण्यात आले. यानंतर अरिजीतने अनेकदा माफी मागूनही सलमानचा राग काही गेला नाही. त्यामुळे हे गाणे राहत फतेह अली खान यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले. विशाल-शेखरने संगीत दिलेल्या या गाण्यास इरशाद कामिल याने लिहले आहे. याच गाण्यास सलमानने देखील गायले असून ते गाणे दोन दिवसात प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2016 4:59 pm

Web Title: sultans romantic song jag ghoomeya releases salman expresses his love for his aarfa aka anushka shamra
Next Stories
1 VIDEO: .. अशी उडवली जातेय सलमानची खिल्ली
2 हॉट दीपिका आणि विन डिझेलसोबत फुटबॉलपटू नेमारची एंट्री?
3 पाहाः हृतिकच्या ‘मोहेंजोदारो’चा मोशन पोस्टर
Just Now!
X