20 September 2020

News Flash

..म्हणूनच माझ्यावर टीका होते- सनी लिओनी

सनीचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळतं.

सनी लिओनी

काही वर्षांपूर्वी ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमधून सनी लिओनीने भारतात पदार्पण केलं. त्यानंतर सनीने तिची ‘पॉर्नस्टार’ ही ओळख न लपवता भारतीय चित्रपटसृष्टीतही पाय ठेवला. त्यामुळे अनेक वेळा तिच्या वाट्याला भूमिकाही त्याच स्वरुपाच्या आल्या. या साऱ्यामुळेच खऱ्या आयुष्यातील सनीची ओळख जगापासून लपली गेली आणि ती लोकांसाठी केवळ ‘पॉर्नस्टार’ म्हणूनच राहिली. त्यामुळेच तिचा हा जीवनप्रवास ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’या बायोपिक वेबसिरिजमधून उलगडणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तीने नुकतेच काही खुलासे केले आहेत.

सनीचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळतं. या प्रमोशनच्या निमित्ताने सनीने तिच्या आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला असून अनेकवेळा तिला वादाच्या भोवऱ्यात कसं खेचण्यात आलं हे तिनं सांगितलं.

काही दिवसापूर्वी सनीचा एक डान्स परफॉर्मेस रद्द करण्यात आला होता. या कार्यक्रमावरुन सनीवर अनेक स्तरांमधून टीकास्त्र सोडण्यात आलं होतं. त्यावेळी मौन बाळगणाऱ्या सनीने यावेळी या टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘काही व्यक्तींना उगाच टीका करण्याची सवय असते. त्यांच्या मते एखाद्यावर टीका करणं सोप असतं. ते समोरच्या व्यक्तीला कमकुवत समजत असतात. त्यामुळे या व्यक्ती मलादेखील कमकुवत आणि कमजोर समजतात. त्यांच्या दृष्टीने मला लक्ष्य करणं सोपं असतं. याकारणामुळेच मला वारंवार लक्ष्य करण्यात येतं आणि मी टीकेची धनी होते’, असं सनीने म्हटलं.

पुढे ती असंही म्हणाली, ‘आता मी टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. कोण माझ्यावर काय टीका करतंय याकडे मी लक्ष देत नाही. हा प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न आहे की त्याने कसं वागावं’. दरम्यान, टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणाऱ्या सनीच्या ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’या बायोपिकचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून तो १६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 10:04 am

Web Title: sunny leone says i do not see myself as a victim but i may be a soft target
Next Stories
1 ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार अक्षयकुमार-रजनीकांतचा ‘2.0’
2 ‘शुभ लग्न सावधान’साठी छापण्यात आली लग्नपत्रिका
3 रोहित-जुईलीमुळे मिळाला तेजस्विनीच्या आठवणींना उजाळा
Just Now!
X