News Flash

‘केदारनाथ’मधील जोडी पुन्हा एकत्र येणं अशक्य; सुशांत सिंह राजपूतचा मोठा निर्णय

सुशांतने का घेतला असेल हा निर्णय

सुशांत सिंह राजपूत, सारा अली खान

जून २०१३ मध्ये केदारनाथ येथे झालेल्या ढगफुटीमुळे निर्सगाचं रौद्ररुप कसं असतं हे साऱ्या देशानं पाहिलं. या ढगफुटीमुळे हजारोंनी आपले प्राण गमावले, कित्येकांनी आपली जीवाभावाची माणसं डोळ्यादेखत गमावली. याच प्रसंगावर आधारित २०१८ मध्ये ‘केदारनाथ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील सारा आणि सुशांत यांची  केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच आवडली. त्यामुळे ही जोडी पुन्हा एकदा एकत्र यावी अशी प्रेक्षकांची इच्छा होती. परंतु या चित्रपटानंतर सारासोबत पुन्हा काम न करण्याचा निर्णय सुशांत सिंह राजपूतने घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

कलाविश्वात पदार्पण केल्यानंतर अवघ्या काही काळातच टॉपची अभिनेत्री होण्याचा मान सारा अली खानला मिळाला. विशेष म्हणजे तिचे अगदी मोजके चित्रपट प्रदर्शित झाले असूनही तिने कलाविश्वात दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे तिच्यासोबत काम करण्यासाठी अनेक अभिनेत्यांचा प्रयत्न असतो. मात्र सुशांतने तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला आहे.

‘केदारनाथ’ चित्रपटावेळी सारा आणि सुशांत यांच्यातील जवळीक वाढली होती. मात्र हे गोष्ट साराच्या आईला अर्थात अमृता सिंगला मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी साराला सुशांतपासून लांब राहण्याचा सल्ला दिल्या. याचकारणामुळे सारा सुशांतपासून लांब राहू लागली होती. त्यानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी एकमेकांपासून फारकत घेतली. परंतु ही गोष्ट सुशांत विसरलेला नाही. एका जाहिरातीसाठी सुशांतला सारासोबत काम करण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र सुशांतने सारासोबत काम करण्यास स्पष्ट नकार दिला.

‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, सुशांतला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत काम करण्याची इच्छा नव्हती. सध्या सुशांत आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगत आहेत. तर सारा आणि कार्तिक आर्यन एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जातं आहे. अलिकडेच सुशांतचा ‘छिछोरे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सर्व स्तरांमधून त्याच्या अभिनयाचं कौतुक करण्यात आलं. तर साराचे आतापर्यंत तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून तिचे तीनही चित्रपट बॉक्सऑफिसवर तुफान गाजले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 10:43 am

Web Title: sushant singh rajput refused to work with ara ali khan ssj 93
Next Stories
1 मदतीचा हात पुढे करुनही अक्षय कुमार पिछाडीवर, पाहा लोकप्रियतेत कोणी केली मात
2 हे आहे बबड्याचं ‘क्वारंटाइन शेड्युल’
3 Coronavirus: ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या निर्मात्याच्या मुलीची दुसरी करोना चाचणी निगेटीव्ह
Just Now!
X