News Flash

Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूतचा रुममेट सिद्धार्थने लग्नासाठी केली जामिनाची मागणी

नुकतीच एनसीबीने कारवाई करत सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली होती.

(photo-file/instagram/sidharth pithani)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला येत्या १४ जूनला एक वर्ष पूर्ण होत आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास अद्यापही सुरू असून नुकतीच एनसीबीने कारवाई करत सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणात चौकशी सुरु असताना सिद्धार्थचं नाव समोर आल्याने एनसीबीने सिद्धार्थला अटक केली. त्यानंतर आता सिद्धार्थ पिठानीने लग्नासाठी कोर्टाकडे जामिनाची मागणी केलीय. २६ जूनला सिद्धार्थचं लग्न आहे.

वृत्तानुसार सिद्धार्थचे वकील तारक सईद यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. सिद्धार्थ पिठानीच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत २६ जूनला हैदराबादमध्ये सिद्धार्थ लग्न असल्याचं सांगण्यात आलंय. यासाठी त्याने न्यायालयात लग्नपत्रिकेची एक प्रत जमा केलीय. यासाठीच सुशांतचा रुममेट सिद्धार्थला कोर्टाने जामीन मंजूर करावा अशी मागणी वकिलांकडून करण्यात आलीय. या प्रकरणात सिद्धार्थला फसवलं जातं असल्याचं या याचिकेत म्हंटलं आहे. सिद्धार्थचा नुकताच सारखपुडा पार पडला होता. त्याच्या साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth pithani (@pithanisiddharth)

सिद्धार्थ पिठानी सुशांत सिंह राजपूतच्या तपासातील महत्वाची व्यक्ती आहे. कारण १४ जून २०२० रोजी ज्यावेळी सुशांतने आत्महत्या केली तेव्हा सिद्धार्थ घरातच होता. सिद्धार्थ पिठानी सोबतच ड्रग्ज प्रकरणात सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत. रिया चक्रवर्ती तसचं शोविक चक्रवर्ती यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र सिद्धार्थ वगळता इतर सर्वांना जामिनावर सोडण्यात आलंय.

सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचा मृतदेह पहिल्यांदा पाहणाऱ्यांमध्ये सिद्धार्थचं नावं आहे. सिद्धार्थ आणि सुशांत एकत्र राहत असल्याने त्यांच्यात चांगली मैत्री होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 1:31 pm

Web Title: sushant singh rajput roommate sidharth pithani seeks bail for his marriage kpw 89
Next Stories
1 कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरमधला वाद मिटला, पुन्हा शोमध्ये दिसणार एकत्र?
2 Dilip Kumar Health Update: ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना आज मिळणार रुग्णालयातून डिस्चार्ज
3 जॅकलिनच्या ‘पाणी पाणी’ गाण्याच्या रिहर्सल व्हिडीओवर राखी सावंतची भन्नाट कमेंट, म्हणाली..
Just Now!
X