News Flash

सुशांतच्या बहिणीने केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती

जाणून घ्या काय म्हणाली...

सुशांत व त्याची बहीण श्वेता

सुशांत सिंह राजूपतच्या आत्महत्या प्रकरणाला सध्या एक नवे वळण आले आहे. त्याची कथित प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतच्या वडिलांनी  गुन्हा दाखल झाला. यामध्ये रियावर फसवणूक आणि मानसिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडींदरम्यान मौन बाळगलेल्या रिया चक्रवर्तीच्या वकीलांनी  शुक्रवारी रियाचा व्हिडीओ शेअर करत सत्याचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर आता सुशांतच्या बहिणीने ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे.

सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने ‘मी सुशांत सिंह राजपूतची बहिण आहे आणि तुम्ही या प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मी विनंती करते. आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्याल अशी मी अपेक्षा करते’ असे म्हटले असून ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे.

तसेच तिने या ट्विटमध्ये ‘नमस्कार सर, माझ्या मनात कुठे तरी असे वाटते की तुम्ही सत्याच्या बाजूने आहात. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत. ज्यावेळी माझा भाऊ बॉलिवूडमध्ये होता तेव्हा त्याच्या कोणी गॉडफादर नव्हता आणि आताही नाही. या प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे आणि या प्रकरणातील पुराव्यांसोबत कोणतीही छेडछाड होणार नाही अशी मी विनंती करते या आशयाची पोस्ट तिने केली आहे.

यापूर्वी इन्स्टाग्रामवर देवदेवतांचा फोटो पोस्ट करत श्वेताने सर्वांना सत्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले होते. ‘सर्वजण एकीने खंबीरपणे उभे राहुयात आणि सत्याची साथ देऊयात’, अशी पोस्ट श्वेताने लिहिली होती. रियाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड व अभिनेत्री अंकिता लोखंडे हिनेसुद्धा सोशल मीडियावर ‘सत्याचा विजय होतो’, अशी पोस्ट लिहिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 11:20 am

Web Title: sushant singh rajput sister shweta demand justice request to pm narendra modi avb 95
Next Stories
1 बॉबी देओलचे वेब विश्वात पदार्पण, सीरिजमधील फर्स्ट लूक प्रदर्शित
2 व्हायरल झालेल्या व्हिडीओवर रिया चक्रवर्तीचे स्पष्टीकरण, म्हणाली…
3 सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले..,
Just Now!
X