News Flash

सुशांतकडून क्रितीला वाढदिवसाची सरप्राईज पार्टी?

सुशांतच्या वांद्रे इथल्या घरी क्रितीने साजरा केला वाढदिवस

सुशांत सिंग राजपूत, क्रिती सनॉन

बॉलिवूडमध्ये सध्या सर्वात जास्त चर्चिली जाणारी जोडी म्हणजे सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सनॉन. दोघांचा नुकताच ‘राबता’ चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जरी विशेष कामगिरी करू शकला नसला तरी या जोडीने चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आणि आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यानही सर्वांचंच लक्ष वेधलं. दोघांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री, डिनर डेट्स, आयफा सोहळ्यादरम्यान हॉटेलमध्ये क्रितीच्या बाजूचीच खोली हवी यासाठी सुशांतचा आग्रह या सर्व चर्चा माध्यमांमध्ये बऱ्याच गाजल्या. आता पुन्हा हीच जोडी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे क्रितीसाठी सुशांतने प्लॅन केलेली सरप्राईज पार्टी.

दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २७ जुलै रोजी क्रितीने तिचा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्त सुशांतने तिच्यासाठी विशेष पार्टी आयोजित केल्याचं म्हटलं जातंय. सुशांतच्या वांद्रे येथील घरी क्रिती आणि सुशांतने वाढदिवस साजरा केला. या पार्टीमध्ये क्रितीच्या आगामी ‘बरेली की बर्फी’ चित्रपटाच्या टीममधील काही जणदेखील सहभागी झाले.

वाचा : क्रिती सनॉनवर भैरवी गोस्वामीची अर्वाच्च शब्दांत टीका

दोघांनीही त्यांच्यातील प्रेमासंबंधाची खुलेपणाने कधीच वाच्यता केली नसून आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत असेच हे दोघे माध्यमांना सांगत आलेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सुशांत म्हणाला की, ‘आमच्या दोघांबद्दल मी अनेक चर्चा, बातम्या ऐकतो. ब्रेकअप, पॅचअपपासून सर्व गोष्टी ऐकायला मिळतात. या सर्व चर्चा रंजक जरी असल्या तरी त्या खऱ्या नाहीत. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. आमच्या दोघांच्या आवडीनिवडी सारख्या असल्याने एकमेकांसोबत वेळ घालवणे आम्हाला आवडते.’

वाचा :…म्हणून अंकिताला सुशांतचं तोंडही पाहायचं नाही

दुसऱ्या बाजूस या चर्चांवर क्रितीचे म्हणणे होते की, ‘या चर्चांचा आमच्या मैत्रीवर काही परिणाम होत नाही. सत्य काय आहे हे आम्हा दोघांना माहित आहे. चित्रपटसृष्ट्रीत सहकलाकारांसोबत नातेसंबंध जोडल्याच्या चर्चा काही नवीन नाहीत.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 1:20 pm

Web Title: sushant singh rajput threw a surprise party for kriti sanon
Next Stories
1 क्रिती सनॉनवर भैरवी गोस्वामीची अर्वाच्च शब्दांत टीका
2 ‘झी टॅाकीजवर कॅामेडी अवॉर्ड्स’च्या विजेत्यांची संपूर्ण यादी
3 सेलिब्रिटी आणि पाऊस..
Just Now!
X