अभिनेता सुशांत सिंह राजूपत मृत्युप्रकरणाच्या तपासाचा वेग आता वाढल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत पोलिसांनी अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. परंतु, याच काळात सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीने कुटुंबीयांसोबत पलायन केलं आहे. मात्र, सध्या रिया कुठे आहे हे सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांना माहित असल्याचं ‘पिंकव्हिला’च्या वृत्तात म्हटलं आहे.

विकास सिंह यांनी दिलेल्या मुलाखतीत रियाचा पत्ता ठाऊक असून तो मी सांगू शकत नाही असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे या प्रकरणाला पुन्हा एका नवं वळण मिळाल्याचं दिसून येत आहे.

“रिया चक्रवर्तीने पलायन केलं आहे आणि ती लपून बसली आहे. रिया सध्या कुठे आहे हे मला माहित आहे. परंतु, मी तुम्हा सांगू शकत नाही. तसंच सध्या पाटणा पोलिसांनादेखील क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यामुळे सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा छडा आता सीबीआयनेच लावला पाहिजे”, असं विकास सिंह म्हणाले.

दरम्यान, रियाने काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या कुटुंबीयांसोबत पलायन केल्याचं म्हटलं जात आहे. रिया राहत असलेल्या इमारतीच्या मॅनेजरने ही माहिती दिली आहे. परंतु, रिया नेमकी कुठे आहे हे अद्याप कोणालाच ठाऊक नाही.