News Flash

सुष्मिता सेन या महिन्यात अडकणार विवाहबंधनात?

इन्स्टाग्रामवरून रोहमन आणि सुष्मिताची प्रेमकहाणी सुरू झाली.

सुष्मिता सेन, रोहमन शॉल

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत मॉडेल रोहमन शॉलला डेट करत असल्याचं सांगितलं. तेव्हापासून सुष्मिताच्या सोशल मीडिया अकाऊंटवर रोहमनसोबतचे बरेच फोटो पाहायला मिळतात. सुष्मिताच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्येही रोहमन सहभागी होतो. आता दोघांनीही हे नातं पुढच्या टप्प्यावर नेण्याचा निर्णय घेतला आहे. सुष्मिता व रोहमन या वर्षाअखेर म्हणजेच नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार असल्याचं वृत्त आहे.

इन्स्टाग्रामवरून रोहमन आणि सुष्मिताची प्रेमकहाणी सुरू झाली. ‘त्याने मला इन्स्टाग्रामवर डायरेक्ट मेसेज पाठवला होता. पण इन्स्टाग्रामवरील मेसेज मी कधीच वाचत नाही. त्यामुळे त्या सर्व न वाचलेल्या मेसेजेसमध्ये त्याचासुद्धा एक मेसेज होता. एकदा मुलीसोबत काहीतरी बोलत असताना अचानक डायरेक्ट मेसेजवर क्लिक झालं. रोहमनचा मेसेज मला इतका आवडला की मी लगेच त्याला रिप्लाय दिला,’ असं सुष्मिताने एका मुलाखतीत सांगितलं होतं. तेव्हापासूनच मेसेजचा सिलसिला सुरू झाला. त्यानंतर रोहमनने सुष्मिताला त्याचा फुटबॉल मॅच पाहण्यासाठी बोलावलं. ही त्यांची पहिली भेट होती. नंतर सुष्मिताने रोहमनला कॉफीचे आमंत्रण दिले.

Photos : राज कपूर यांच्या नातवाचा साखरपुडा

सुष्मिता आणि रोहमन यांच्या वयात १५ वर्षांचं अंतर आहे. यापूर्वी सुष्मिता हॉटेल क्षेत्रातील उद्योग सम्राट रितिक भसिनला डेट करत होती, मात्र सुष्मिता रितिकचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. रितिक बरोबरच सुष्मिताचं नाव रणदीप हुडा सोबतही जोडलं गेलं. मात्र हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही. सुष्मिताने दोन मुलींना दत्तक घेतलं असून गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळातून ती दोघींचं संगोपन करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 6:24 pm

Web Title: sushmita sen and rohman shawl to get married by this month ssv 92
Next Stories
1 Bigg Boss Marathi 2 : नेहासाठी ‘या’ व्यक्तीला मिळाली घरात एण्ट्री
2 Photos : राज कपूर यांच्या नातवाचा साखरपुडा
3 ”तो माझ्या आयुष्यातला सर्वांत वाईट काळ”; ब्रेकअपबद्दल परिणीतीचा खुलासा
Just Now!
X