कधी काळी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्याकडे पाहिलं जायचं.मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे या दोघांनी घटस्फोट घेतला. विशेष म्हणजे एकमेकांपासून विभक्त झालेल्या या जोडीमध्ये आजही मैत्रीचं नातं कायम आहे. त्यामुळे अनेकवेळा या दोघांनी एकत्र पाहायला मिळतं. अलिकडे सुझानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर हृतिकने मजेशीर कमेंट केली आहे.
‘जर तू मला सोडून गेलास तर मी रडत बसणाऱ्यांमधील नाही. कारण मला एका दिवससुद्धा वाया घालवायचा नाही’, अशी कॅप्शन असलेली एक पोस्ट सुझानने शेअर केली होती.
View this post on Instagram
If you leave I won’t cry… I won’t waste a single day..#neverlookback #eaglesnestwarmth
सोबतच तिने खास अंदाजातला एक फोटोदेखील शेअर केला होता. या फोटोवर अनेक सेलिब्रिटींना कमेंट केली असून हृतिकची कमेंट अनेकांचं लक्ष वेधत आहे. या फोटोला हृतिकने ‘सुपर फोटो’ अशी कमेंट दिली आहे.
दरम्यान, या फोटोमध्ये सुझानने हाय हिल्स, जॅकेट आणि मरुन रंगाची जीन्स परिधान केली आहे. त्यामुळे ती या फोटोत अत्यंत सुंदर, बोल्ड आणि बिंधास्त दिसून येत आहे. हृतिक आणि सुझान यांनी २००० मध्ये लग्न केलं होतं. मात्र काही कारणास्तव या दोघांनी २०१३ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला.