04 August 2020

News Flash

अरेच्चा, ही तर स्वानंदी!

‘दिल दोस्ती दोबारा’मध्येही स्वानंदीने तडफदार मुलीची भूमिका साकारली होती.

स्वानंदी टिकेकर

‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’ हा अफलातून फंडा सांगत आपल्या मैत्रीने अवघ्या तरुणाईला वेड लावत सर्वांच्या मनात घर करणारी मालिका म्हणजे ‘दिल दोस्ती दुनियादारी’. या मालिकेने आणि यातील कलाकारांनी सर्वच प्रेक्षकांना आपलंस केलं होतं. मालिकेचा पहिला सिझन संपल्यानंतर एका नव्या नावासोबत आणि नव्या गोष्टींसह ‘दिल दोस्ती दोबारा’ हा दुसरा सिझन सुरु करण्यात आला. माजघरातून खयाली पुलाव रेस्तराँपर्यंत पोहचलेल्या या दोस्तांमध्ये अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, पुजा ठोंबरे, सखी गोखले आणि स्वानंदी टिकेकर हे कलाकार पाहायला मिळाले. मालिका संपल्यानंतर हे कलाकार आता नाटक, चित्रपट आणि जाहिरातींच्या कामांमध्ये व्यग्र आहेत. त्यातच यातील एका कलाकाराचे फोटो सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारे आहेत. आम्ही बोलतोय अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिच्याबद्दल.

वाचा : ‘होणार सून…’ फेम पिंट्या लग्नाच्या बेडीत अडकला

‘दिल दोस्ती दुनियादारी’ आणि ‘दिल दोस्ती दोबारा’मध्ये काहीशी रावडी पण तितकीच मनाला भावणाऱ्या मुलीची भूमिका स्वानंदीने साकारली होती. सर्वसामान्य मुलींच्या चौकटीत न बसणाऱ्या मिनलचे स्वतःचे काही विचार होते. ‘दिल दोस्ती दोबारा’मध्येही स्वानंदीने तडफदार मुलीची भूमिका साकारली होती. पण, आता स्वानंदीचे जे काही फोटो समोर आले आहेत, ते पाहता ‘अरे, ही तर स्वानंदी!’ असे शब्द तुमच्या तोंडून आल्यावाचून राहणार नाहीत.

वाचा : ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरच्या यशात ‘या’ मराठमोळ्या तरूणाची साथ

बऱ्याचदा जीन्स आणि टी-शर्ट अशा ‘कॅज्युअल लूक’मध्ये दिसणारी स्वानंदी यावेळी तिच्या पारंपरिक लूकमुळे लक्ष वेधून घेत आहे. स्वानंदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने गुलाबी रंगाची बारीक काठ असलेली पिवळ्या रंगाची साडी नेसलेली दिसते. त्यावर साजेसा असा हार आणि बांगड्याही तिने घातल्याचे दिसते. स्वानंदीचा हा सालस लूक नक्कीच लक्षवेधी आहे.

View this post on Instagram

#prathasarees @kavitakoparkar ❤️

A post shared by Swanandi (@swananditikekar) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2017 9:15 am

Web Title: swanandi tikekar looking gorgeous in traditional look
Next Stories
1 नाटक-बिटक : ‘रंगसंगीत एकांकिका स्पर्धा’ नवीन रंगभाषा घडवतेय
2 आश्काच्या लेहंग्याला ‘बॉलिवूड टच’
3 दोन वर्षांपूर्वी अशी दिसायची ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर
Just Now!
X