News Flash

सचिन-स्वप्निलची ‘नं. १ यारी’

स्वप्निल या सेलिब्रिटी मित्रांशी गप्पा मारणार आहे.

‘नं. १ यारी’ अभिनेते सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांची मैत्री सर्वानाच माहिती आहे. पण त्यांच्या मैत्रीचे आजवर न ऐकलेले किस्से त्यांच्याकडून ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. दर रविवारी ‘कलर्स’ वाहिनीवर ‘नं. १ यारी’ या कार्यक्रमात अशा अनेक सेलिब्रिटी जोडय़ा तुम्हाला त्यांच्या मैत्रीचे किस्से सांगणार आहेत. सचिन पिळगावकर यांचं दिग्दर्शन व अभिनेता स्वप्निल जोशी याचं सूत्रसंचालन असा योग जुळून आलेला हा  कार्यक्रम १८ फेब्रुवारीपासून संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत प्रदर्शित होणार आहे.

स्वप्निल या सेलिब्रिटी मित्रांशी गप्पा मारणार आहे. त्यांचे अनुभव, माहीत नसलेले किस्से, गमतीजमती स्वप्निल त्यांच्यांकडून जाणून घेणार आहे. या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना स्वप्निल म्हणाला, ‘‘हा सेलिब्रिटी चॅट शो असला तरी यातील मैत्रीचा भाग महत्त्वाचा आहे. यामध्ये अनेक माहित नसलेल्या सेलिब्रिटी मित्रांच्या जोडय़ा प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या जोडय़ांसोबत माझीही मैत्री असल्याने मलाही काही मजेशीर गुपित माहीत आहेत ज्याबाबत मी त्यांना पश्न विचारेन. दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी, या कार्यक्रमात फक्त गप्पा नसून रॅपिड फायर व अनेक मजेशीर खेळ आहेत ज्यामुळे गप्पा आणि मनोरंजन या मिलाफ या कार्यक्रमात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे’, असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 12:44 am

Web Title: swapnil joshi and sachin pilgaonkar
Next Stories
1 ‘क्वॉर्टर’ या लघुपटात गिरिजा ओक -गोडबोले
2 ‘ऑस्कर बाहुली’ नेमकी तयार होते तरी कशी?
3 केवळ प्रसिद्धीसाठी ‘# मी टू’चा वापर
Just Now!
X