News Flash

सीतेच्या भूमिकेसाठी मानधनाची रक्कम वाढवलेल्या करीनाची पाठराखण करत तापसी म्हणाली…

सीतेच्या भूमिकेसाठी करीनाने १२ कोटी रुपयांची मागणी केल्याच्या चर्चांमुळे करीनाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.

taapsee pannu on kareena kapoor hike in fee
तापसीने एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान चर्चेत होती. ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड होताना दिसत होत. या मागचे कारण म्हणजे ‘रामायण’ या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटात करीना सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा. या भूमिकेसाठी करीनाने १२ कोटींची मागणी केल्याच्या चर्चा सुरु होत्या. अनेक नेटकऱ्यांनी करीनाला ट्रोल करतं चित्रपटाच्या निर्मात्यांना तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यास सांगितले. दरम्यान, आता अभिनेत्री तापसी पन्नू करीनाची पाठराखण करत आहे.

तापसीने नुकतीच ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तापसीने करीनाची पाठराखण केली आहे. फक्त एका पुरुषाने त्याचे मानधन वाढवल्यावर त्याच्यावर टीका केली जात नाही केवळ एका महिलेने तिचे मानधन वाढवले की तिच्यावर टीका केली जाते.

तापसी म्हणाली, “जर या जागी एक पुरुष असता आणि त्याने एक विशिष्ट रकमेची मागणी केली असती तर ‘इस्की मार्केट बढ गयी है’, म्हणतं त्याच्याकडे पाहिले गेले असते. जसे की त्या माणसाने त्याच्या आयुष्यात खूप मोठं काम केलं आहे. पण एका महिलेने एवढे मानधन मागितल्यानंतर तिला खूप मागणी करणारी म्हटलं जातं. नेहमीच असं असतं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

ती पुढे म्हणाली, “महिलांनी मानधनाची रक्कम वाढवल्यावर आपण असं नेहमीच ऐकत असतो. पण का नाही? ती आपल्या देशातील महिला सुपरस्टार्सपैकी एक आहे. जर तिने जास्त मानधनाची मागणी केली आहे तर तिचे ते काम आहे. तुम्हाला असे वाटते का की पौराणिक कथेतील भूमिका साकारणारे पुरुष विनामूल्य काम करतात? मला तरी असे वाटतं नाही.”

आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

‘बॉलिवूड हंगामा’ला एका स्त्रोताने दिलेल्या वृत्तानुसार, करीनाने तिच्या मानधनाची रक्कम ही ६-८ कोटी रुपयांनी वाढवून १२ कोटी रुपये केली आहे. सीता या चित्रपटासाठी करीनाने १२ कोटी रुपये मानधन म्हणून घेणार असल्याचे सांगितले.

आणखी वाचा : लग्झरी गाड्या ते सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता; जाणून घ्या थलपथी विजयच्या संपत्ती बद्दल

दरम्यान, तापसी लवकरच ‘हसीन दिलरुबा’, ‘रश्मि रॉकेट’, ‘शाबाश मिठु’, ‘लूप लपेटा’, ‘दोबार’ आणि ‘वो लडकी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2021 9:10 am

Web Title: taapsee pannu shuts down attacks against kareena kapoor for hiking her fee to play sita dcp 98
Next Stories
1 अनेक वर्षांची परंपरा मोडत मंदिरा बेदीने पतीवर केले अंत्यसंस्कार; डोळे पाणावतील असे दृश्य
2 घरातल्यांच्या विरोधात जाऊन अर्चना पुरण सिंग यांनी केले होते लग्न
3 इंडियन आयडलमधील स्पर्धकांची प्रशंसा करण्यास सांगण्यात आले होते- सलीम मर्चेंट
Just Now!
X