27 February 2021

News Flash

आयुषमानची बहिण म्हणणाऱ्यांना ताहिराचे सडेतोड उत्तर

नेटकऱ्यांनी ताहिराला आयुषमानची बहिण वाटते असे म्हणत ट्रोल केले आहे

अभिनेता आयुष्मान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप-खुरानाला स्टेज 0 ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. ताहिराला उपचारादरम्यान तिचे केस गमवावे लागले होते. मात्र या परिस्थितीतही ती खंबीरपणे न डगमगता उभी राहिली. विशेष म्हणजे केस गमावल्यानंतर तिने कधीही विग वैगरे वापरला नाही. जशी आहे, तशी साऱ्यांना सामोरी गेली. उपचारानंतर ताहिरा बॉयकट हेअरस्टाईलमध्ये दिसत होती. पण काही नेटकऱ्यांनी तिच्या या लूकची खिल्ली उडवली आहे. आता ताहिराने तिचा मौन सोडत ट्रोलर्सला चांगलेच उत्तर दिले आहे.

काही दिवसांपूर्वी ताहिराने तिच्या छोट्या केसांमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. नेटकऱ्यांनी ताहिराच्या या फोटोवर कमेंट करत तिला ट्रोल केले होते. नेटकऱ्यांनी ताहिराला आयुषमानची बहिण वाटते असे म्हणत ट्रोल केले आहे.

ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देण्यासाठी ताहिराने तिचा आणि आयुषमानचा फोटो इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ताहिराने असे काही कॅप्शन लिहिले आहे की कमेंट करणाऱ्यांचे तोंडच बंद झाले आहे. ‘एवढे भाई-भाईचे जोक ऐकले की जेव्हा मी आयुषमान खुरानाला भेटते तेव्हा बॅकग्राउंडमध्ये एकच गाणी सुरु असतं तू मेरा, तू मेरा, तू मेरा भाई नहीं है!’ असे तिने कॅप्शन दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 9:33 am

Web Title: tahira kashyap give reply to trollers avb 95
Next Stories
1 ‘कूली नं १’च्या रिमेकमध्ये कादर खान यांच्या भूमिकेत दिसणार ‘हा’अभिनेता ?
2 कलाकारांनी नकारात्मक भूमिका करु नये का ?, शाहिदच्या आईचा सवाल
3 शार्क माशापेक्षा जास्त बळी ‘सेल्फी’ने घेतले- सुबोध भावे
Just Now!
X