‘गड आला पण सिंह गेला’ हे कथानक आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासात अनेकदा वाचले आहे. तानाजी मालूसरे यांनी सिंहगडावर गाजवलेला पराक्रम ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी अक्षरश: कौतुकाचा वर्षाव केला. काही मिनिटांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’वर आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात अभिनेता अजय देवगण तानाजींची भूमिका साकारत असून अभिनेत्री काजोल तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. अभिनेता सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे तर राजमाता जिजाऊंची भूमिका पद्मावती राव वटवणार आहेत.