News Flash

झोमॅटो डिलिव्हरी प्रकरण: तरुणीची बाजू घेत तनुश्रीने परिणितीला सुनावलं, म्हणाली…

सध्या तनुश्रीची पोस्ट चर्चेत आहे.

गेल्या आठवड्यात बेंगळुरूमध्ये ऑर्डर रद्द केल्यामुळे तरुणीवर हल्ला केल्याच्या आरोपावरुन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली, त्याला गुरुवारी सशर्त जामीन मंजूर झाला. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्राने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘मला वाटतं तो व्यक्ती निर्दोष आहे’ असे म्हणत त्या तरुणाची मदत करा असे आवाहन केले होते. त्यानंतर आता अभिनेत्री तनुश्री दत्ताने तरुणीची बाजू घेत परिणितीला सुनावले आहे.

तनुश्रीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत परिणितीला सुनावले आहे. “जे पुरुष महिलांवर अत्याचार करतात ते शिक्षा होईल या भीतीने कधीच गुन्हा कबूल करत नाही. स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी ते हवं ते करतील. आजपर्यंत भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात कोणत्याही पुरुषाने ‘हो हा गुन्हा मी केला आहे’ असे म्हटलेले नाही. जर त्या तरुणीने डिलिव्हरी बॉयला शिवीगाळ केली, चपलेने मारले तर तो पोलिसांकडे का गेला नाही? जर हा पब्लिसिटी स्टंट असता तर त्या महिलेने स्वत:ला का मारले असते?” असे तनुश्रीने म्हटले आहे.

आणखी वाचा- Zomato डिलीव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर प्रकरणात नवं वळण, ‘त्या’ तरुणीविरोधातच FIR दाखल

पुढे ती म्हणाली, ‘काही सेलिब्रिटींनी या प्रकरणी त्या डिलिव्हरी बॉयची बाजू घेतली. मी त्यांना इतकच विचारु इच्छिते की घटनास्थळी तुम्ही हजर होतात का? तिथे नेमकं काय घडलं तुम्हाला माहिती आहे का?’

आणखी वाचा- मला वाटतं तो व्यक्ती निर्दोष आहे; झोमॅटो प्रकरणावर परिणितीचे ट्वीट व्हायरल

काय म्हणाली होती परिणिती?
‘झोमाटो इंडिया – कृपया सत्य शोधा आणि जाहीरपणे कळवा… जर तो माणून निर्दोष असेल (आणि मला विश्वास आहे की तो निर्दोष आहे) तर त्या महिलेला देखील दंड देण्यास आम्हाला मदत करा.. हे अमानुष, लज्जास्पद आणि हृदयद्रावक आहे.. कृपया मी यासाठी कशा प्रकारे मदत करू शकतो हे मला कळवा’ या आशयाचे ट्वीट परिणितीने केले होते.

आणखी वाचा- ऑर्डर रद्द केली म्हणून झोमॅटो डिलिव्हरी बॉयने महिलेचं नाकच फोडलं; रक्तबंबाळ अवस्थेतील व्हिडीओ केला पोस्ट

काय आहे डिलिव्हरी बॉयचा आरोप?
पहिल्यांदा त्या तरुणीने हितेशाने मला शिव्या दिल्या आणि चपलेने मारलं असा आरोप डिलिव्हरी बॉय कामराजने केला आहे. ट्रॅफिकमुळे डिलिव्हरी करण्यास थोडा उशीर झाला होता, त्यामुळे मी त्यांची माफी मागितली. पण त्या खूप रागात होत्या. त्यावर रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे मला उशीर झाल्याचं मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी डिलिव्हरीचे पैसै देण्यास नकार दिला आणि झोमेटॉच्या कस्टमर केअरसोबत बोलत असल्याचं सांगितलं. या दरम्यान झोमॅटो सपोर्ट स्टाफने त्यांची ऑर्डर रद्द केल्याचं मला समजलं. त्यावर मी त्यांच्याकडून ऑर्डर परत मागितली पण त्यांनी सहकार्य केलं नाही. अखेर मी ऑर्डर न घेता इमारतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, पण त्याचवेळी त्यांनी मला चप्पलेने मारायला सुरूवात केली. मी स्वतःचा बचाव करत होतो, पण त्यावेळी मला मारण्याच्या नादात हितेशा यांच्या हातातील अंगठी त्यांच्याच नाकावर लागली आणि रक्तस्त्राव सुरू झाला. असा आरोप कामराजने केला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर हितेशाने व्हिडिओ शेअर करुन ऑर्डर कॅन्सल केल्याच्या रागातून झॉमेटॉच्या डिलिव्हरी बॉयने मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला अटक केली. नंतर झोमॅटोनेही या घटनेची गंभीर दखल घेत हितेशाची माफी मागितली आणि डिलिव्हरी बॉयचं तात्पुरतं निलंबन करत असल्याचं जाहीर केलं. पण, आता डिलिव्हरी बॉयने केलेल्या आरोपांनंतर या घटनेला वेगळं वळण आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 1:29 pm

Web Title: tanushree dutta slamis celebs supporting zomato delivery guy avb 95
Next Stories
1 करन जोहरच्या मुलाला व्हायचं आहे शाहरुख खान; शेअर केला ‘शाहरुख’ लूक
2 गौहर खानला नियम तोडणं चांगलंच भोवलं; FWICE कडून मोठी कारवाई
3 हृतिक रोशनचं कोणाकडे आहे एवढं लक्ष?; चाहत्यांच्या या भन्नाट कमेंट्स वाचाच
Just Now!
X