तनुश्री-नाना पाटेकर वादात विनाकारण नाव गोवलं गेल्यामुळे त्रस्त झालेल्या अक्षयनं सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. या वादात अक्षयनं कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही मात्र तरीही अक्षयचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अक्षय तनुश्री विरोधात बोलताना दिसत आहे. मात्र हा व्हिडिओ जुना असून तो एडिट करून त्यात अक्षयच्या तोंडी तनुश्रीचं नाव टाकण्यात आलं आहे.
या प्रकरणात अक्षयनं शनिवारी सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान हा व्हिडिओ आता युट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे. जुन्या पत्रकार परिषदेत अक्षयला एका आघाडीच्या अभिनेत्रीविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातील अक्षयच्या प्रतिक्रियेची एडिटींगद्वारे मोडतोड करून त्यांच्या तोंडी तनुश्रीचं नाव टाकण्यात आलं. मात्र अशी कोणतीही प्रतिक्रिया तनुश्रीच्या विरोधात आपण दिली नसल्याचं अक्षयचं म्हणणं आहे.
Mumbai: Akshay Kumar on Saturday filed a complaint to cyber police stating that during an event he was asked a question on an actress but the part uploaded on YouTube was edited&actress' name was replaced with Tanushree Dutta. Complaint also filed with YouTube. Investigation on. pic.twitter.com/z2UIlkBRBC
— ANI (@ANI) October 8, 2018
त्यामुळे आता सायबर सेल या व्हिडिओ मागे असलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहे. काही दिवसांपूर्वी तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तणुकीचा आरोप केला होता. तसेच अक्षय कुमार सारख्या ब़ड्या कलाकारांनी नाना पाटेकर यांच्यासारख्या कलाकारासोबत काम करणं पूर्णपणे थांबवलं पाहिजे तरच Metoo सारखी मोहिम भारतात यशस्वी होईल असं तनुश्री म्हणाली होती. तनुश्रीनं नानांवर आरोप केल्यानंतर अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती.