25 February 2021

News Flash

कंगनाच्या अकाऊंटवर कारवाई; चिडलेल्या ‘क्वीन’नं दिली धमकी, म्हणाली…

वादग्रस्त विधानं करणाऱ्या कंगनावर ट्विटरची कारवाई

ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करुन वारंवार वादग्रस्त विधानं करणाऱ्या कंगनावर ट्विटरने तात्पुरते निर्बंध आणले आहेत. यामुळे चिडलेल्या कंगनाने थेट धमकीच दिली असून तिच्याविरोधात भूमिका घेणाऱ्यांना तुमचं जगणं अवघड करणार असल्याचं तिनं म्हटलं आहे.

सध्या ट्विटरने आपल्या धोरणांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या संसदेत झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंटही बंद केले होते. तीच वेळ ट्विटरवरुन वारंवार वादग्रस्त विधानं करणाऱ्या कंगनावर ओढवली आहे. ट्विटरने तात्पुरते निर्बंध आणल्यानंतर कंगनाने ट्विटरचे सीईओ जॅक डोर्से यांच्यावर शरसंधान साधलं आहे.

कंगनानं ट्विटरवर लिहिलं की, “लिबरल लोक आपले काका जॅक यांच्याकडे जाऊन रडत आहेत आणि माझ्या अकाउंटवर काही काळासाठी निर्बंध आणले आहेत. ते मला धमक्याही देत आहेत. ट्विटरवरच अकाउंट म्हणजेच माझी व्हर्चुअल ओळख देशासाठी शहीद होऊ शकते. मात्र, माझं रिलोडेड देशभक्तीचं व्हर्जन सिनेमांद्वारे पुन्हा पुन्हा परत येईल. याद्वारे ‘तुमचं जगणंच मी अवघड बनवून ठेवेल'”

कंगनाने नुकतेच तिच्या नव्या सिनेमाची घोषणा केली. या चित्रपटाचं नाव ‘मणिकर्णिका रिटर्न्स : दि लिजेंड ऑफ दिद्दा’ असं आहे. घोषणेपासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका लेखकाने चित्रपट निर्माते आणि कंगनावर आपलं पुस्तक ‘दिद्दा : द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर’ या पुस्तकावरुन कथा चोरल्याचा आरोप केला आहे. तर कंगना तेजस, धाकड आणि थलाइवी या इतर चित्रपटांतही दिसणार आहे. धाकडमध्ये कंगनासोबत अर्जुन रामपालही दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 2:23 pm

Web Title: temporary restrictions on the twitter account angry kangana threatened said aau 85
Next Stories
1 केवळ १६ सेकंदामध्ये स्पर्धकाने पूर्ण केलं अमिताभ यांनी दिलेलं चॅलेंज
2 आता मुंबईत ‘तांडव’ होणार! उत्तर प्रदेश पोलीस चौकशीसाठी मुंबईत
3 ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिकेमध्ये आस्ताद काळेची एण्ट्री
Just Now!
X