News Flash

‘तेरे बिना’मध्ये झळकलेली ‘ही’ चिमुकली आहे तरी कोण? नेटकऱ्यांना पडला प्रश्न

जाणून घ्या, कोण आहे ही मुलगी

सध्या देशामध्ये लॉकडाउन सुरु असल्यामुळे घरात बसून प्रत्येक जण कंटाळला आहे. त्यामुळे कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी विविध मार्गाने नागरिकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये अभिनेता सलमान खान यांचं ‘तेरे बिना’ हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्यात त्याच्यासोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने स्क्रीन शेअर केली आहे. विशेष म्हणजे या गाण्यात दोन दिग्गज कलाकार असूनही प्रेक्षकांचं खरं लक्ष वेधलं आहे ते या व्हिडीओत झळकलेल्या लहान मुलीने. ही लहान मुलगी कोण असावी असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

सलमान खानचं ‘तेरे बिना’ हे गाणं कमी वेळामध्ये लोकप्रिय ठरलं असून यात सलमान आणि जॅकलीनची उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. मात्र या गाण्याच्या शेवटी झळकलेली मुलगी अनेकांच्या पसंतीत उतरत आहे. या मुलीचं नाव सियैना रॉबिशन असं असून ती अभिनेत्री वलुचा डिसुझाची लेक असल्याचं म्हटलं जात आहे.

‘तेरे बिना’ हे गाणं सलमानने स्वत: गायलं असून त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. तर सुधीर एहमद याने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. हे गाणं युट्यूबवर प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे काही तासांत एक लाखांपेक्षा अधिक वेळा हे गाणं पाहिलं गेलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. भाईजानचे चाहते तर या गाण्यासाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 11:21 am

Web Title: tere bina song salman khan on screen daughter sienna robinson ssj 93
Next Stories
1 मिळालेला वेळ सकारात्मक गोष्टींसाठी घालवा – अक्षया देवधर
2 “पायी प्रवास करणाऱ्यांना आत्मनिर्भर म्हणायचं की लाचार?”, विशालचा मोदींना सवाल
3 बॉलिवूड अभिनेत्याच्या वडिलांना करोनाची लागण; बंगला केला सील
Just Now!
X