चित्रपटाच्या आशयानुसार व दिग्दर्शक नितिश तिवारी याने लिहिलेल्या पटकथेनुसार ‘दंगल’ हे नाव हवे होते. पण ते मात्र सलमान खानने आवर्जून दिले, असे आमीर खानने सांगितले. ‘दंगल’ चित्रपटाचे पोस्टर प्रसार माध्यमासमोर आणले तेव्हा आमीर बोलत होता.तो पुढे म्हणाला ‘दंगल’ नाव पुनित इस्सारकडे होते. ते सलमानमार्फत मिळू शकेल असे समजल्याने मी सलमानची भेट घेतली. त्याने मला पूर्ण सहकार्य दिले. सलमानचा ट्रेनर राकेश यानेही मला भरपूर सहकार्य केले. ‘सुल्तान’च्या चित्रीकरण काळात तो सलमानकडे होता इतकेच. राहुल भट्टने माझे ९०, ९५ किलोपर्यंतचे वजन आणि ते कमी करणे हे सांभाळले. चित्रपटात आपण ४ मुलींच्या पित्याची म्हणजे महावीर सिंगची भूमिका साकारली आहे. चित्रीकरण करताना सर्वप्रथम ९० किलो वजनाच्या साठीतील माणसाच्या भूमिकेचे चित्रीकरण केले व मग वजन कमी कमी केल्यावर तरूणपणाचा भाग चित्रीत झाला. २३ डिसेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होत असला तरी ‘सुल्तान’ पहायला येणारे प्रेक्षक दंगलचेही पोस्टर पाहतील म्हणूनच ते इतक्या लवकर प्रदर्शित करीत आहेात, असेही आमीर म्हणाला. ‘दंगल’चा मराठीतील अर्थ विचारात घेऊ नका. उत्तर भारतात दंगल म्हणजे संघर्ष होत असल्याचेही तो म्हणाला. तो या चित्रपटात ४ मुलींच्या पित्याच्या भूमिकेत असून कुस्तीच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे कथानक आहे.