26 February 2021

News Flash

ब्रेकअपनंतरच त्याच्या करिअरला उतरती कळा; कपिलच्या एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा

'जेव्हा आम्ही रिलेशनशीपमध्ये होतो, तेव्हा कपिलच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टी व्यवस्थित हाताळल्या जात होत्या. मात्र, आम्ही वेगळे झाल्यानंतर त्याच्या करिअरला उतरती कळा लागली.'

प्रिती सिमोईस, कपिल शर्मा

वादग्रस्त ट्विटमुळे कॉमेडियन कपिल शर्मा सतत चर्चेत राहिला आहे. ट्विटरवरून प्रसारमाध्यमांना केलेली शिवीगाळ ताजी असतानाच त्याने त्याच्या दोन माजी व्यवस्थापक आणि एका पत्रकाराविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रीती सिमोईस आणि निती सिमोईस या दोघी कपिलच्या माजी व्यवस्थापक होत्या. त्यापैकी प्रीती ही त्याची एक्स गर्लफ्रेंड असल्याचंही म्हटलं जातं. कपिलने दाखल केलेल्या तक्रारीनंतर संपूर्ण प्रकरणावर प्रीतीने प्रसारमाध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतरच कपिलच्या करिअरला उतरती कळा आल्याचं तिनं यावेळी म्हटलं.

प्रसारमाध्यमांना शिवीगाळ करणारे ट्विट हे कपिलने केले नसून, कोणा दुसऱ्या व्यक्तीने त्याचा फोन वापरत केल्याचा संशयही तिने व्यक्त केला. ‘कपिल ज्या पत्रकाराचा उल्लेख करत आहे, त्याला मी ओळखतसुद्धा नाही. तो जेव्हा नैराश्यात होता, तेव्हा त्याचे मित्र किंवा कथित प्रेयसी गिन्नी छत्रथने त्याची साथ का दिली नाही? जेव्हा आम्ही रिलेशनशीपमध्ये होतो, तेव्हा वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टी व्यवस्थित हाताळल्या जात होत्या. मात्र, आम्ही वेगळे झाल्यानंतर त्याच्या करिअरला उतरती कळा लागली,’ असं ती म्हणाली.

‘कपिलला मी गेल्या आठ वर्षांपासून ओळखते. मात्र आज माझ्यासमोर एक वेगळाच कपिल उभा आहे. तो खूप बदलला आहे आणि यासाठी त्याच्यासोबत असणाऱ्या लोक जबाबदार आहेत. त्याला प्रत्येक अडचणींतून मी वाचवलं आहे. तेव्हा एकही शूटिंग रद्द झाली नव्हती. त्याचा शो लोकप्रिय होता आणि तो सुद्धा खूप खूश होता. याउलट आता वेगळीच परिस्थिती आहे,’ असंही तिनं सांगितलं.

वाचा : अनुष्का शर्माला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’

नीती सिमोईस आणि प्रिती सिमोईस या दोघी २०१६-१७ मध्ये कपिलची सर्व महत्त्वाची कामं पाहायच्या. मात्र, प्रसारमाध्यमांसमोर कपिलची प्रतिमा नीट सादर न केल्याप्रकरणी, वेळेवर काम न केल्याप्रकरणी त्यांना नोकरीवरून काढून टाकल्याचं त्याने तक्रारीत म्हटलं होतं. सध्या या दोघी सुनील ग्रोवरच्या नव्या शोसाचं काम पाहतात. कपिलचा वाद ज्याच्यासोबत झाला, त्या सुनीलसोबत या दोघींनी हातमिळवणी केल्याप्रकरणी बरेच तर्कवितर्क लावले जात होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 3:05 pm

Web Title: the downfall only came after we separated preeti simoes opens up about kapil sharma
Next Stories
1 अनुष्का शर्माला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’
2 सलमानच्या अडचणी संपेना; जामिनाविरोधात बिश्णोई समाज हायकोर्टात जाणार
3 पुन्हा रिळं उलगडणार..
Just Now!
X