News Flash

Video: कपिल-सुनीलला एकत्र आणण्यासाठी सिद्धूपाजींनी घातली साद

'ये शो एक गुलदस्ता है.. ये तेरा है ना मेरा है.. '

'द कपिल शर्मा शो' चा शंभरावा भागाची जोरदार तयारी

सोनी टेलिव्हिजनवर प्रसारित होणारी विनोदाची मैफल सुनील ग्रोवर आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांमुळे सुनी झाली आहे. कपिल आणि सुनीलच्या विमान प्रवासातील वादानंतर लोकप्रिय ‘द कपिल शर्मा शो’ची रंगत पहिल्यापेक्षा कमी झाल्याची चर्चा रंगत आहे. मात्र, कपिलचा लोकप्रिय कार्यक्रम सुनील, अली असगर, चंदन प्रभाकर आणि सुगंधा मिश्रा या सहकाऱ्यांच्या अनुपस्थितीत शंभरीला गवसणी घालण्यास सज्ज झालाय. रविवारी ‘द कपिल शर्मा शो’चा शंभरावा भाग प्रसारित होणार आहे. या पर्वणीच्या क्षणासाठी कपिलने जोरदार तयारी केली असून त्याच्या या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच प्रसिद्ध झाला. या प्रोमोमध्ये कपिलने  प्रेक्षकांसह सध्याच्या घडीला सोबत नसणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

कपिल शर्माच्या शंभराव्या भागात काँग्रेसचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. त्यांनी प्रोमोच्या माध्यमातून कपिल आणि सुनील यांना एकत्र येण्याचे आवाहन केल्याचे पाहायला मिळाले. सिद्धू यांनी शेर सादर करत  सुनील ग्रोवरसहअन्य कलाकारांनी कपिलच्या कार्यक्रमात परत येण्यासाठी साद घातली. यावेळी कपिलच्या विनोदाच्या व्यासपीठाला सिद्धू यांनी गुलदस्त्याची उपमा दिली. सिद्धू म्हणाले की, ‘ये शो एक गुलदस्ता है.. ये तेरा है ना मेरा है.. ये पुरे हिंदुस्तान का है! सिद्धूजींच्या शेर शायरीच्या फटकेबाजीनंतर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर पुन्हा एकत्र येतील का ? हे येणारा काळच ठरवेल. मात्र, शंभराव्या भागात आज सिद्धूजींची शेर शायरीची फटकेबाजी आणि भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंची धम्माल यामुळे कार्यक्रमात एक वेगळा रंग नक्कीच पाहायला मिळणार आहे.

सुनील ग्रोवरने ‘द कपिल शर्मा शो’ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर कपिलने इतर कलाकारांच्या साथीने कार्यक्रम सुरु ठेवला आहे. तर कपिलप्रमाणेच सुनील ग्रोवरनेही लाइव्ह शोच्या माध्यमातून मनोरंजन करताना दिसत आहे. वादानंतरही कपिल आणि सुनील एकमेकांचे कौतुक करताना पाहायला मिळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 5:44 pm

Web Title: the kapil sharma show 100th episode kapil thanks who left and navjot singh sidhu requests them to return watch video
Next Stories
1 सलमानची ऑस्ट्रेलियात ‘दबंगगिरी’; सोनाक्षीसोबत ठुमके अन् प्रभूदेवासोबत ‘जलवा’
2 ‘अजानचा मोठा आवाज असुरक्षिततेच्या भावनेपोटी’
3 ‘टिवटिवाट’नं उजाडली सोनू निगमची सकाळ; अजानचा व्हिडिओ केला शेअर
Just Now!
X