News Flash

मानधनात उर्वशीने सलमानला टाकले मागे, तासाभरासाठी घेतलेली रक्कम वाचून व्हाल अवाक

आतापर्यंत कोणत्याच कलाकाराने एक तासाच्या डान्ससाठी इतके मानधन घेतलेले नाही

नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येकजण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात करत असतो. अनेक ठिकाणी मोठमोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांमध्ये बॉलिवूड कलाकार देखील सहभागी होतात. त्यांची तासाभराची हजेरी अनेकांमध्ये आणखी उत्साह निर्माण करुन जाते. पण हेच कलाकार एका तासाच्या हजेरीसाठी कोट्यावधी रुपयांचे मानधन घेतात हे तुम्हाला माहिती आहे का? नुकताच अभिनेत्री उर्वशी रौतेला नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये एक तास हजेरी लावण्यासाठी किती रक्कम घेणार हे समोर आले आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजीत केलेल्या एका पार्टीमध्ये उर्वशी रौतेला हजेरी लावणार आहे. ती या पार्टीमध्ये १ तास डान्स करणार असून त्यासाठी ती तब्बल ३ कोटी रुपये मानधान घेणार असल्याचे म्हटले जात आहे. ती ‘डॅडी मम्मी’, ‘हसीनों का दीवाना’ आणि ‘पागलपंती’ या गाण्यावर डान्स करणार असल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत कोणत्याच कलाकाराने एक तासाच्या डान्ससाठी इतके मानधन घेतले नसल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवासांपूर्वी उर्वशीचा ‘पागलपंती’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जॉन अब्राहम, अनिल कपूर, अरशद वारसी, कृती खरबंदा, पुलकित सम्राट आणि इलियाना डिक्रूज हे कलाकार झळकले होते. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. आता लवकरच उर्वशी एका तामिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुशी गणेशन करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 8:56 am

Web Title: this bollywood actress get high paid for in hour dance performance in new year party avb 95
Next Stories
1 वाहिन्यांत भीम दिसतो गा..
2 ‘वडिलांबरोबर काम करायला आवडेल’
3 ‘थोडं तुझं, थोडं माझं’: मनोकायिक चकवा
Just Now!
X