22 February 2020

News Flash

मामा- भाच्याचे वैर! गोविंदामुळे ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कृष्णा गायब

रविवारच्या भागात अभिनेता गोविंदा, त्याची पत्नी सुनीता व मुलगी टीनासोबत पोहोचला होता.

कृष्णा अभिषेक, गोविंदा

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दर आठवड्यात नवनवीन पाहुणे हजेरी लावत असतात. या पाहुण्यांसोबत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी कपिल शर्मा व त्याचे सहकारी सज्ज असतात. रविवारच्या भागात अभिनेता गोविंदा, त्याची पत्नी सुनीता व मुलगी टीनासोबत पोहोचला होता. मात्र या भागात ‘द कपिल शर्मा शो’चा सध्याचा हुकुमी एक्का मानला जाणारा कॉमेडियन कृष्णा अभिषेकच गायब होता. यामागचं कारण मामा व भाच्यातील वैर मानलं जात आहे. मामा गोविंदासोबत कृष्णा व त्याच्या पत्नीचे गेल्या काही दिवसांपासून वैर सुरू आहे.

आपल्या मुलीच्या पहिल्या गाण्याच्या अल्बमचं प्रमोशन करण्यासाठी गोविंदा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचला होता. शोच्या नव्या सिझनमध्ये सहभागी झालेल्या कृष्णा अभिषेकची कॉमेडी प्रेक्षकांना फार आवडू लागली आहे. कृष्णाच्या डान्स, अभिनयात गोविंदाची झलक दिसते, असंही अनेकजण म्हणतात. रविवारच्या एपिसोडमध्ये सुरुवातीला तो झळकला होता. मात्र मामा गोविंदाने हजेरी लावताच कृष्णा शोमध्ये दिसेनासा झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कौटुंबिक कलहामुळे कृष्णाने या एपिसोडपासून लांब राहण्याचं ठरवल्याचं म्हटलं जात आहे.

काही दिवसांपूर्वी कृष्णाची पत्नी कश्मीरानेही या भांडणाबाबत वक्तव्य केलं होतं. ”गोविंदा माझ्या व कृष्णाच्या मुलांना भेटलासुद्धा नाही. भविष्यात हा दुरावा कमी होईल असं मला वाटत नाही,” असं ती म्हणाली होती. कृष्णा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सपनाची व्यक्तिरेखा साकारतो. या व्यक्तीरेखेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं आहे.

First Published on October 14, 2019 1:41 pm

Web Title: this is why krushna abhishek did not come for the kapil sharma show govinda episode ssv 92
Next Stories
1 ‘त्या’ कॉलनंतर सलमान झाला सुपरस्टार – गोविंदा
2 ‘वॉर’नंतर हृतिक लवकरच दिसणार ‘क्रिश ४’ चित्रपटात
3 Video: अजय देवगणने शेअर केली ‘हिरकणी’च्या साहसगाथेची झलक