25 February 2021

News Flash

या अभिनेत्रीला ट्विटरवर घातली लग्नाची मागणी

यावर न रागवता तिस्काने जश्यास तसं उत्तर दिलं

बॉलिवूड अभिनेत्री टिस्का चोप्रा हिला काही दिवसांपूर्वी ट्विटरवर लग्नाची मागणी घालण्यात आली आहे. तिचे लग्न संजय चोप्रा यांच्यासोबत आधीच झालेले असतानाही तिला पुन्हा एकदा लग्नासाठी मागणी घालण्यात आली. सोशल मीडियावर तिच्या एका चाहत्याने माझ्याशी लग्न कराल का असा प्रश्नच विचारला. यावर न रागवता तिस्काने जश्यास तसं उत्तर दिलं. ती त्या चाहत्याला म्हणाली की, मी असा प्रश्न विचारण्याची वाटच बघत होते. हो मी नक्कीच तुमच्याशी लग्न करने. कृपया तुम्ही तुमची सर्व माहिती मला द्यावी. कोणत्या व्यक्तीसाठी मी माझ्या नवऱ्याला सोडते आहे हे त्याला ही पाहायचे आहे. तिस्का आतापर्यंत तारे जमीं पर, रहस्य आणि किस्सा या सिनेमात दिसली आहे. अॅमेझॉन फॅशन वीक २०१७ मध्ये कविता भारतीयासाठी शो स्टॉपर बनणार आहे. ५ दिवसांचा हा फॅशन वीक बुधवारपासून सुरु होणार आहे. शुक्रवारी तिस्का शो स्टॉपर असणार आहे.

तिस्का लवकरच चटनी या लघुपटात दिसणार आहे. या सिनेमात एका मध्यम वर्गीय भारतीयाची कथा मांडण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी तिस्काने कास्टिंग काऊचवर आपले मत मांडले होते. स्टोरी टेलर या यूट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की, माझा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला होता, पण त्यानंतर काम कसं मिळणार हे मला माहित नव्हतं. मी दोनदा माझ्या घरीही जाऊन आले होते. तेव्हा मला एका नावाजलेल्या निर्मात्याचा कॉल आला. तो मला म्हणाला की, तू मला भेटत का नाही, मी एका नवीन सिनेमासाठी कास्टिंग करत आहे. मी जेव्हा तिकडे पोहचले तेव्हा त्यांनी मला हिल्समध्ये कसे चालायचे हे शिकायची गरज आहे असे सांगितले.

त्यानंतर तिस्काने त्या दिग्दर्शकासोबत काम केल्याचा अनुभवही शेअर केला. जेव्हा मी माझ्या मित्रांना सांगितले की मला या सिनेमात एक भूमिका मिळाली आहे. तेव्हा माझे मित्र म्हणाले की त्या दिग्दर्शकासोबत काम करायचं म्हणजे त्याची सगळ्यात खास व्यक्तीही बनावं लागतं. तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला याबद्दल काहीही माहित नाही. मला कामही करायचं होतं. पण अशा पद्धतीने काम करण्याची तयारी नव्हती. यावर उपाय म्हणून मी त्यांच्या बायकोशी मैत्री केली. मी माझ्या मनाची पूर्ण तयारी केली आणि मुंबईला शूटिंग सुरुही झाले. मुंबईच्या शूटींगमध्ये सर्व काही ठिक होतं. नंतर बाहेरगावी जाऊन शूट करायचे होते. तेव्हा एकाच हॉटेलमध्ये एकाच माळ्यावर आमच्या खोल्या होत्या. काही दिवस सर्व काही ठिक होतं. तिस-याच दिवशी निर्माते माझ्या जवळ आले आणि म्हणाले, स्क्रिप्टविषयी बोलण्यासाळी मला माझ्या रुममध्ये येऊन भेट. यानंतर मी त्याला रात्री ८ वाजता त्याच्या हॉटेल रुमवर भेटायला गेले. तेव्हा तो निर्माता लुंगी परिधान करुन बसला होता…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 5:42 pm

Web Title: tisca chopra said yes to the marriage proposal given on twitter
Next Stories
1 चित्रपटातील धोनीपेक्षा खरा धोनी खूपच चांगला दिसतो- रजत कपूर
2 राज कपूर यांच्या ‘आवारा’ या चित्रपटामुळे भारत आणि चीनदरम्यान झाला करार
3 पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित होणे ‘मुश्कील’
Just Now!
X