25 February 2021

News Flash

नुसरत जहाँ आणि यश यांचा मंदिरातील व्हिडीओ व्हायरल, अफेअरच्या चर्चांना उधाण

यावर दोघांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. नुसरत यांनी २०१९मध्ये उद्योजक निखिल जैनशी लग्न केले. पण आता नुसरत आणि निखिल यांच्या नात्यामध्ये दूरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. इतकच नव्हे तर नुसरत या एसओएस कोलकता चित्रपटामधील त्यांचा सहकलाकार यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान त्यांचा एकत्र असलेला जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नुसरत आणि यश हे एका मंदिरात गेले असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या नुसरत आणि यश यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. पण नुसरत यांनी या सर्व चर्चांवर वक्तव्य करत पूर्ण विराम दिला आहे. हा व्हिडीओ डिसेंबर महिन्यातील आहे असे नुसरत यांनी म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@yashiaans_are_always_special_)

आणखी वाचा: नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांच्या नात्यात फूट; अभिनेत्री करतेय ‘यश’ला डेट?

यशने कोलकत्ता टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर प्रतिक्रिया दिली. ‘हा व्हिडीओ डिसेंबर महिन्यातला आहे. जुने व्हिडीओ आणि फोटो शेअर करत लोकं अफवा का फसरवत आहेत मला माहिती नाही. तेव्हा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता आणि अनेक फॅन पेजने देखील तो वापरला होता. आता लोकं उगाच माझ्या आणि नुसरत विषयी अफवा पसरवत आहेत’ असे यशने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 2:37 pm

Web Title: tmc mp nusrat jahan visits temple with yash dasgupta in viral video he reacts avb 95
Next Stories
1 ५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला स्पर्धकाने सोडला गेम, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?
2 Video: रणबीरने प्रियांकाला शाहिदच्या नावाने चिडवले अन्…
3 ‘…म्हणून ‘त्या’ भूमिकांकडे आकर्षित होतो’; सैफचा खुलासा
Just Now!
X