करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सध्या जगभरातील लोक त्रस्त आहेत. अनेक नामांकित कलाकारांसह जगभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान अभिनेता टॉम हँक्स यांनी मात्र करोनावर यशस्वीरित्या मात केली. NDTVला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी करोना उपचारादरम्यान आलेला आपला अनुभव सांगितला.
अवश्य पाहा – “कमाल आर. खानला अनफॉलो करा”; दिग्दर्शकाची अमिताभ बच्चन यांना विनंती
काय म्हणाले टॉम हँक्स?
“माझ्या तुलनेत माझी पत्नी रीटा हिला प्रचंड त्रास झाला. तीन आठवडे तिने काहीही खाल्लं नव्हतं. आम्हाला जागेवरुन उठताही येत नव्हतं. शरीरात प्रचंड वेदना जाणवत होत्या. खूप थकल्यासारखं जाणवायचं. त्यानंतर आम्हाला एका स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आलं. उपचारादरम्यान आम्ही क्वारंटाईनमध्ये होतो. आमच्या खोलीत फक्त डॉक्टर्स आणि परिचारिकाच येत असतं. त्यांनी योग्य उपचार देऊन आमची रोगप्रतिकार शक्ती वाढवली. परिणामी आम्ही तीन आठवड्यात बरे होऊन घरी परतलो.” असा अनुभव टॉम हँक्स यांनी सांगितला.
टॉम हँक्स आणि रीटा विल्सन पहिले सेलिब्रिटी होते ज्यांना करोना विषाणूची लागण झाली होती. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्यावर उपचार केला गेला. करोनामधून बरं झाल्यानंतर २७ मार्चला त्यांनी लॉस एंजेलिसमध्ये येऊन फोटोशूट केले होते. टॉम हँक्स व्यतिरिक्त एद्रिस एल्बा, कॅथी ग्रीफिन, बॉण्ड गर्ल ओल्गा कुरिलेन्को या कलाकारांनी देखील करोना विषाणूवर यशस्वीरित्या मात केली.