News Flash

नेहा कक्करची सुशांतला संगीतमय श्रद्धांजली; व्हिडिओला ७० लाखांहून अधिक व्ह्यूज

नेहा कक्करने गायलेलं गाणं ऐकून व्हाल थक्क

बॉलिवूड गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. मात्र यावेळी ती अभिनेता सुशांत सिंह राजपुतमुळे चर्चेत आहे. सुशांतला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तिने एक गाणं गायलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या गाण्याला युट्यूबवर तब्बल ७० लाख व्हूज मिळाले आहेत.

नेहाने सुशांतसाठी गायलेल्या या गाण्याचा व्हिडीओ आपल्या युट्यूब अकाउंटवर पोस्ट केला आहे. “ना मारेगी दीवानगी मेरी, ना मारेगी आवारगी मेरी, कि मारेगी ज़्यादा मुझे मौत से नाराज़गी तेरी” असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं सुशांतच्या केदारनाथ या चित्रपटातील आहे. हे गाणं चित्रपटात अरजित सिंहने गायलं होतं. हेच गाणं गाऊन नेहाने सुशांतला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला वैतागून आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 5:35 pm

Web Title: tribute to sushant singh rajput by neha kakkar mppg 94
Next Stories
1 Video : “मराठी इंडस्ट्रीतही घराणेशाही”; सखी-सुव्रतचं मत
2 घराणेशाहीमुळे अनेक चित्रपट गमावले- तापसी पन्नू
3 स्विमिंग कॉश्च्यूममधील अनुष्काच्या हॉट फोटोवर विराटची प्रतिक्रिया; म्हणतो…
Just Now!
X