02 March 2021

News Flash

‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारला महिलेनंच केला अश्लील मेसेज

महिलेविरोधात आवाज उठवून आपली ताकद दाखवूयात, असं आवाहन गायत्रीने चाहत्यांना केलं आहे.

गायत्री दातार

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री गायत्री दातारला सोशल मीडियावर वाईट अनुभव आला. एका महिलेने गायत्रीच्या फेसबुक अकाऊंटवर अश्लील मेसेज पोस्ट केला. या मेसेजचा स्क्रिनशॉट गायत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे.

‘नुकताच हा मेसेज फेजबुक पेजवर वाचला आणि मला धक्काच बसला. हे असं बोलण्याची गरज आहे का ? हे योग्य आहे का?,’ असं गायत्रीने लिहिलं. पुढे तिने म्हटलं की, मी अशा मेसेजची प्रसिद्धी करत नाहीये. पण इथे त्या व्यक्तीचा फेसबुक अकाऊंट आहे. तिच्याविरोधात आवाज उठवा. आपली ताकद दाखवूयात, अशा शब्दांत गायत्रीने चाहत्यांना आवाहन केलं आहे. आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्या महिलेचा अकाऊंट खरा आहे की खोटा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्या महिलेने कशामुळे गायत्रीला असा मेसेज पाठवला हेसुद्धा समजू शकले नाही.

गायत्रीने ‘तुला पाहते रे’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या मालिकेनंतर ती रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. ‘निम्मा शिम्मा राक्षस’ या व्यावसायिक नाटकाद्वारे ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती ‘कोल्हापूर डायरिज’ या चित्रपटातही झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 2:48 pm

Web Title: tula pahate re fame gayatri datar received obscene message from a woman ssv 92
Next Stories
1 Sacred Games 2 : उत्कंठा वाढली, नवीन टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
2 “मी निर्वासित”, शेखर कपूरच्या ट्विटवर जावेद अख्तर भडकले
3 अभिजीत बिचुकले आजपासून ‘बिग बॉस’च्या घरात
Just Now!
X