28 September 2020

News Flash

‘या’ तारखेला विक्रांत-इशा अडकणार विवाहबंधनात

मालिकेचा एक तासाचा विशेष भाग प्रसारित होणार

सुबोध भावे, गायत्री दातार

वय विसरायला लावणारी अनोखी प्रेमकहाणी ही संकल्पना घेऊन झी मराठी वाहिनीने ‘तुला पाहते रे’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली. अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. श्रीमंत घरातला विक्रांत सरंजामे आणि मध्यमवर्गीय कुटुंबातली इशा निमकर यांची प्रेमकहाणीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतली. विक्रांत इशाला प्रपोज करणार तेव्हा मालिकेचा महाएपिसोड निर्मात्यांनी प्रसारित केला. आता मालिकेत लवकरच इशा आणि विक्रांत विवाहबंधनात अडकणार आहेत.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार नवीन वर्षात १३ जानेवारी रोजी एक तासाचा विशेष एपिसोड प्रसारित होणार आहे. या विशेष भागात इशा आणि विक्रांतचा लग्नसमारंभ पार पडणार आहे. या दोघांमधील वयाचं आणि राहणीमानाचं अंतर पाहता हे लग्न कोणत्याही विघ्नांविना पार पडणार का हे या एपिसोडमध्ये पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

वाचा : ‘मला तो अवयव सर्वाधिक आवडतो’, तापसीच्या उत्तराने नेटकरीही गोंधळले

प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे मालिकेत विक्रांतची भूमिका साकारत आहे. तर नवोदित अभिनेत्री गायत्री दातार इशाच्या भूमिकेत आहे. या दोघांची केमिस्ट्रीसुद्धा विशेष चर्चेत आहे. पहिल्या महिन्यापासूनच मालिकेने टीआरपी यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 4:06 pm

Web Title: tula pahate re marathi serial updates isha nimkar and vikrant saranjame to get married soon
Next Stories
1 बॉलिवूडच्या ‘खान’दानला मात देत दीपिका ठरली ‘नंबर वन स्टार’
2 ‘मला तो अवयव सर्वाधिक आवडतो’, तापसीच्या उत्तराने नेटकरीही गोंधळले
3 रोहित शेट्टी म्हणतोय…. म्हणून साराला दिलं ‘सिम्बा’मध्ये काम
Just Now!
X