News Flash

राजवीरला कळेल का पियूची खरी ओळख? ‘कारभारी लय भारी’मध्ये येणार नवा ट्विस्ट

पियूमुळे राजवीरला होणार मारहाण

सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे कारभारी लय भारी. कमी कालावधीत ही मालिका तुफान लोकप्रिय झाली असून या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीत उतरले आहे. सध्या या मालिकेत राजवीर आणि पियू यांच्यातील मैत्री दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. मात्र, लवकरच पियूचं सत्य राजवीर समोर येणार आहे.

भांडणापासून सुरुवात झालेल्या राजवीर आणि पियूची आता चांगली गट्टी जमली आहे. ते एकमेकांचे मित्र झाले आहेत. खरं तर पियू ही अंकुशराव पाटलांची मुलगी असल्याचं राजवीरला अद्याप माहित नाही. परंतु, पियूची ही ओळख लवकरच त्याच्या समोर येणार आहे. विशेष म्हणजे पियूकडून घडलेल्या एका नकळत कृतीपायी राजवीर अडचणीत येणार आहे आणि त्याच काळात त्याला पियूची खरी ओळख समजणार आहे.

पियू स्वत:ला राजवीरला तिची खरी ओळख सांगणार असते. मात्र, त्यापूर्वीच तिच्या नावाचे बॅनर संपूर्ण गावात लागतात. बॅनर पाहून तिची खरी ओळख राजवीरला समजू नये त्यामुळे ती तिच्याच बॅनरवर शेण फेकते. परंतु, त्याचवेळी तिथे वीरु आणि जग्गू पोहोचतो आणि वीरुनेच हे पोस्टर खराब केलेत असा जग्गूचा समज होतो. ज्यामुळे तो जग्गू आणि त्याचे मित्र वीरुवर हल्ला करतात.

दरम्यान, अंकुशरावला हा प्रकार कळल्यानंतर तो संतापतो आणि वीरुला कोंडू ठेवतो. याविषयी पियूला समजल्यानंतर ती जग्गू आणि अंकुशरावला सत्य सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र, तिच्याकडे सगळे दुर्लक्ष करतात. तर दुसरीकडे अंकुशराव वीरुला सूर्यवंशी घरात टाकून जातो आणि दोन्ही घरात प्रचंड वाद होतो. अशावेळी पियू वीरुला सांगू शकणार का तिची खरी ओळख ? हा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. मात्र, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ही मालिका पाहावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 6:49 pm

Web Title: tv show karbhari laybhari new twist ssj 93
Next Stories
1 ‘अर्जुन तू आसपास असतोस तेव्हा’… काय म्हणाली हे मलायका
2 मंत्र्यासोबत डिनर करण्यास दिला नकार, विद्या बालनच्या सिनेमाचं चित्रीकरण थांबवलं
3 ‘द कपिल शर्मा शो’मधून ‘या’ कलाकारांनी घेतली एक्झिट